Mumbai News : आयआयटी मुंबईमध्ये (IIT Mumbai) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन (NCoE-CCU) चे  राष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे केंद्र भारत सरकारद्वारे अनुदानित देशातील पहिलं, असं केंद्र आहे. ज्याला डिसेंबर 2021 मध्ये औपचारिकपणे मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या संशोधनाच्या प्राथमिक महत्व हे जागतिक हवामानातील कार्बनडाय ऑक्सईड (CO2) ची भूमिका समजून घेणे. सोबतच, औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रातून उत्सर्जित होणारे CO2 कमी करण्याच्या धोरणांचा समावेश असेल.  CO2 कॅप्चर, वाहतूक,वर्धित पेट्रोलियम पुनर्प्राप्तीमध्ये वापर आणि बायोमासमध्ये रूपांतरण हे कार्य केंद्राच्या प्रमुख उपक्रमांपैकी असतील. कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अ‍ॅण्ड स्टोरेज (CCUS) हा हवामानातील बदल कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय असल्याचे समोर आले आहे.


गेल्या वर्षी ग्लासगो, यूके येथे झालेल्या COP-26 मध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन राष्ट्र बनण्याच्या वचनबद्धतेसह, हवामानाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी  'पंचामृत'  घटक समोर आणले. CCUS अनेकदा सद्याच्या आणि भविष्यात येणाऱ्या ऊर्जा-केंद्रित उद्योगांना डीकार्बोनाइज करण्यासाठी योग्य तांत्रिक उपाय म्हणून निर्धारित केले गेले आहे. .


हे राष्ट्रीय केंद्र कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशन वापराच्या क्षेत्रात एक मल्टी-डीसीप्लिनरी, दीर्घकालीन संशोधन, विकास, सहयोग व निर्मिती केंद्र म्हणून काम करेल. NCoE द्वारे क्रॉस-डिसिप्लिनरी प्रशिक्षण पुढील पिढीच्या संशोधकांमध्ये  समस्या-केंद्रित दृष्टीकोन विकसित करेल. नॅशनल सेंटर डोमेनमधील सध्याच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोबत नावीन्यपूर्ण कार्याचा कॅप्चरिंग आणि मॅपिंग सुलभ करेल


संशोधनासह डोमेनमधील संशोधक, उद्योग आणि भागधारकांचे नेटवर्क विकसित करेल. NCoE ने अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्था (जसे की इतर IIT, विद्यापीठे आणि CSIR लॅब) आणि उद्योग (पेट्रोलियम, सिमेंट, पॉवर, स्टील इ.) सह भागीदारी स्थापन करेल. नवीन नोकर्‍या निर्माण करणे, सामाजिक आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरणविषयक चिंता कमी करणे आणि नवीन बाजारपेठ आणि व्यवसायाच्या संधी विकसित करणे हे CCU चे फायदे आहेत. कालांतराने, शैक्षणिक आणि उद्योगाशी संबंधित सर्व CCUS कार्यासाठी जागतिक ज्ञान आणि संसाधन केंद्र म्हणून आणण्याचे केंद्राचे उद्दिष्ट असेल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI