Lata Mangeshkar Last Song : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. 'सौगंध मुझे इस मिट्टी की' हे गाणे त्यांनी शेवटचे गायले आहे. 


भारतातील 'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. 'सौगंध मुझे इस मिट्टी की' हे देशभक्तीपर गाणे त्यांनी शेवटचे गायले. हे गाणे 30 मार्च 2019 रोजी प्रदर्शित झाले होते. त्याआधी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या लग्नासाठी गायत्री मंत्र रेकॉर्ड केला होता. तर 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंग दे बसंती' या सिनेमात त्यांनी शेवटचे बॉलिवूड गाणे गायले होते. 


सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम


जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मानही लता मंगेशकरांच्या नावावर आहे. लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. फिल्मी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी नॉन फिल्मी गाणीही उत्तम गायली आहेत. 1945 मध्ये, उस्ताद गुलाम हैदर, लतादीदींना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एका निर्मात्याच्या स्टुडिओत घेऊन गेले, ज्यात कामिनी कौशल मुख्य भूमिकेत होती. त्या चित्रपटासाठी लतादीदींनी पार्श्वगायन करावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, गुलाम हैदर यांची निराशा झाली.


लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात तशी 1942 मध्ये झाली. पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. मात्र त्या आधी 1938 साली त्यांनी सोलापुरात पहिल्यांदा गायन केलं होतं. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar: लता मंगेशकरांचे नागपूरच्या पैठणीशी खास नातं; जाणून घ्या काय आहे बातमी


Lata Mangeshkar : 'आपका साया साथ होगा'; 'अमूल'नं लता दीदींना वाहिली श्रद्धांजली


Shah Rukh Khan : शाहरुखसोबत गौरी नाही, तर ‘या’ व्यक्तीने लावली लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्कारला हजेरी