Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली. लता दीदींच्या बहीण आशा भोसले (Asha Bhosle) यांनी लता दीदींसोबतचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो लता दीदी आणि आशा भोसले यांच्या बालपणीचा आहे.
आशा भोसले यांची पोस्ट
आशा भोसले यांनी सोशल मीडियावर लता दीदींसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'बचपन के दिन भी क्या दिन थे, दीदी आणि मी.' आशा ताईंच्या या पोस्टला 50 हजाराहून अधिक नेटकऱ्यांनी लाइक केले आहे. तसेच 1800 पेक्षा जास्त लोकांनी या फोटोला कमेंट करून लता दीदींना श्रद्धांजली वाहिली.
लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने आज (सोमवार) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar And Shraddha Kapoor : लता मंगेशकर अन् श्रद्धा कपूर यांच्यातील खास नातं!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha