Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. चित्रपटसृष्टी बरोबरच विविध क्षेत्रातील लोकांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली. अमूल (Amul) कंपनीनं देखील नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

  


प्रसिद्ध डेअर ब्रँड अमूल कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमधून अमूल कंपनीनं लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. पोस्टमध्ये लता दीदींचे तीन फोटो दिसत आहेत. त्यापैकी एकामध्ये त्या गाणं गाताना दिसत आहेत तर दुसऱ्यामध्ये त्या वीणा वादन करताना दिसत आहेत. फ्रेममध्ये लता दीदींचा बालपणीचा फोटो दिसतोय. या पोस्टमध्ये लता दीदींच्या मेरा साया या गाण्याचे बोल लिहिलेले दिसत आहेत. पण  त्या गीताचे बोल 'हम जहां जहां चलेंगे आपका साया साथ होगा'  असे लिहिलेले दिसत आहे. मेरा साया हा चित्रपट  1966 मध्ये प्रदर्शित झाला होता. अमूल कंपनीनं ही पोस्ट शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'भारताच्या कोकिळेला भावपूर्ण श्रद्धांजली!'






लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता दीदी या आपल्या बांधवांमध्ये सर्वात मोठ्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दिदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar : पानपट्टीवाल्याकडे लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा सर्वात मोठा संग्रह, लता दीदींनी स्वत: मागवले होते रेकॉर्डिंग


Lata Mangeshkar : बचपन के दिन भी क्या दिन थे...; लता दीदींच्या आठवणीत रमल्या आशाताई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha