Madhuri Dixit : शाहरूख खान ते अक्षय कुमारपर्यंत माधुरीने शेअर केला 'या' कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितने अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या तिच्या नेटफ्लिक्स शो 'द फेम गेम'च्या (Fame Game) यशाचा आनंद घेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत माधुरीने अभिनेते शाहरुख खान, अक्षय कुमार, सैफ अली खान आणि सलमान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तिने शाहरुखला 'उत्साही' म्हटले आहे तर सलमान खानला त्याचा आणि 'एक स्वॅग है' असं म्हटलं आहे.
शाहरुखबरोबर, माधुरीने दिल तो पागल है, देवदास, कोयला, अंजाम असे बरेच चित्रपट केले आहेत. तिने सलमानबरोबरदेखील अनेक सिनेमे केले आहेत, त्यापैकी हम आपके है कौन..!, साजन, हम तुम्हारे हैं सनम आणि दिल तेरा आशिक या चित्रपटांचा विशेष उल्लेख केला जातो. माधुरी, अक्षय आणि सैफ 1999 मध्ये आलेल्या आरजू चित्रपटात एकत्र दिसले होते.
सिद्धार्थ कन्ननसोबतच्या संभाषणात माधुरीने शाहरुख, अक्षय, सलमान आणि सैफबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “एसआरके हा खूप शूर माणूस आहे, तो नेहमी 'तुम्ही आरामदायक आहात का, ठीक आहात का?' तो खूप काळजी घेणारा व्यक्ती आहे. अक्षयला नेहमीच स्वतःला सिद्ध करायचे असते, तो सेटवर एक व्यावहारिक जोकर होता. सैफचे वन-लाइनर्स खूप मजेदार असतात. तर, सलमान खूपच खोडकर आहे, तो मोठा आवाज करणारा नाही तर खूप खोडकर आहे. उनका एक स्वॅग है." अशी प्रतिक्रिया माधुरीने दिली आहे.
नेटफ्लिक्स सीरिज द फेम गेमद्वारे माधुरीने ओटीटी माध्यमात पदार्पण केले. शोमध्ये, ती बॉलिवूड सुपरस्टार अनामिका आनंदची भूमिका साकारताना दिसत आहे, जी अचानक गायब होते. तिच्या बेपत्ता होण्यामुळे तपासाला प्रवृत्त केले जाते. ज्यामुळे तिच्या जीवनाची तपशीलवार छाननी होते. अभिनेता संजय कपूर आणि मानव कौल यांचीदेखील या सीरिजमध्ये महत्वाची भूमिका आहे. या वेब सीरिजची निर्मिती दिग्दर्शक-निर्माते करण जोहरने केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Housefull : अखेर थिएटर गजबजलं.. सिने-नाट्यगृहाबाहेर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड
- Majhi Tujhi Reshimgath : यश-नेहाची रेशीमगाठ जुळता जुळेना, नेहासोबत चार प्रेमाचे शब्द यश बोलणार का?
- Me Vasantrao : सांगीतिक रंगाची उधळण! शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत रंगला ‘मी वसंतराव’चा संगीत सोहळा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha