Madhuri Dixit Web Series The Fame Game :  बॉलिवूडची 'धक-धक गर्ल'  म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. तिच्या  चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. माधुरी आता लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. माधुरीची 'द फेम गेम'  (The Fame Game) ही सीरिज 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.  'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये 'द फेम गेम' चा स्टार कास्ट हजेरी लावणार आहे. या शोमध्ये माधुरीनं वेगवेळे मजेशिर किस्से सांगितले. 

Continues below advertisement


द कपिल शर्मा शोमध्ये माधुरीनं सांगितलं की, तेजाब चित्रपटातील एक दो तीन हे गाणं पाहण्यासाठी माधुरी बुरखा घालून सिंगल स्क्रिन असलेल्या चंदन चित्रपटगृहात गेली होती. 'मोठ्या पडद्यावर एक दो तीन गाणं सुरू झालं तेव्हा लोक नाणी फेकत होते', असंही माधुरी म्हणाली. पुढे तिनं सांगितलं की, 'जे लोक नाणी फेकत होती ते माझ्या डोक्यावर पडत होती.'  






'द फेम गेम'  या सीरिजमध्ये माधुरीसोबत  संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'द फेम गेम' या सीरिजचे दिग्दर्शन  बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांनी केले आहे. तसेच श्रीराव यांनी या सीरिजचे कथानक लिहिले आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha