Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा 'पुष्पा- द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की रश्मिका प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत आहे.
रिपोर्टनुसार, रश्मिका आणि विजय हे मुंबईमधील आणि हैद्राबादमधील एकाच जिममध्ये जातात. तसेच यावर्षीचे न्यूईअर सेलिब्रेशन देखील त्यांनी एकत्र केलं. न्यू ईयर सेलिब्रेशन करण्यासाठी रश्मिका आणि विजय हे गोव्याला गेले होते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रश्मिकाला, 'ती लग्न कधी करणार?', असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला तिनं उत्तर दिलं, 'मी अजून याबाबत कोणताही विचार केला नाही. माझ वय लहान आहे. मला असा पार्टनर पाहिजे ज्यासोबत मला कम्फर्टेबल वाटेल. '
लवकरच रश्मिका बॉलिवूड पदार्पण येणार आहे. ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात काम करणार आहे.
हेही वाचा :
- Mika Singh : मिका सिंहकडून बप्पीदांना सांगीतिक श्रद्धांजली, गाण्यांमधून दिला ‘गोल्डन सिंगर’च्या आठवणींना उजाळा!
- Devednra Fadnavis, Amruta Fadnavis : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...
- Dadasaheb Phalke Death Anniversary : दादासाहेब फाळकेंच्या ‘हलत्या चित्रां’चं स्वप्न पुढे मनोरंजन विश्व बनलं! जाणून घ्या त्यांच्या प्रवासाबद्दल...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha