Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेला अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या अभिनयानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतो. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सलमान हा 2016 मध्ये 100 कोटी मानधन घेणारा पहिला अभिनेता ठरला होता. त्यानंतर त्याने टायगर जिंदा है या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार,  या चित्रपटासाठी त्यानं 130 कोटी मानधन घेतलं आहे. 


सलमान एका महिन्यात जवळपास 16 कोटी कमावतो. मुंबईमधील बांद्रा परिसरातील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानचा 1 बीएचके फ्लॅट आहे. तसेच त्याचे पनवेलमध्ये फार्म हाऊस देखील आहे. रिपोर्टनुसार सलमानकडे  2,255 रूपये एवढी एकूण संपत्ती आहे. तसेच गेली कित्येक वर्ष सलमान बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. तो या शोसाठी जवळपास 350 कोटी मानधन घेतो.






लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


हेही वाचा :


Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : विजय देवरकोंडासोबत जोडलं जातंय रश्मिकाचं नाव ; लग्नाबाबत नॅशनल क्रश म्हणाली...


Devednra Fadnavis, Amruta Fadnavis  : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha