Munawar Faruqui : पायल रोहतगीची कारल्याशी तुलना, मुनव्वर फारुकीवर भडकली अभिनेत्री
Lock Upp : कंगना रनौत व्यतिरिक्त, एकता कपूर देखील 'लॉक अप' शोच्या शनिवारच्या एपिसोडमध्ये दिसली.
![Munawar Faruqui : पायल रोहतगीची कारल्याशी तुलना, मुनव्वर फारुकीवर भडकली अभिनेत्री Lock Upp Update Munawar Faruqui compares payal rohtagi with Bitter guard Munawar Faruqui : पायल रोहतगीची कारल्याशी तुलना, मुनव्वर फारुकीवर भडकली अभिनेत्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/02d2bccf3399547513068b6d8685e94e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lock Upp : 'लॉक अप' मध्ये (Lock Upp ) सर्व स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या अभिनयाने ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कंगना रनौत व्यतिरिक्त, एकता कपूर देखील शोच्या शनिवारच्या एपिसोडमध्ये दिसली. आता एकता कपूर शोच्या स्पेशल एपिसोडमध्ये पोहोचली असेल, तर काहीतरी खास तर घडणारच ना! यावेळी एकता स्पर्धकांशी संवाद साधताना दिसली. तिने स्पर्धकांना एक टास्क दिला, ज्यामध्ये त्यांना टेबलवर ठेवलेली एक वस्तू त्यांच्या साथीदारांना भेट म्हणून द्यायची होती. यावेळी एकता स्पर्धकांना त्यांचे खरे रूप दाखवण्यास सांगते.
या विशेष भागाचा प्रोमो व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये पायल रोहतगी अंजलीची तुलना ‘पॉटी’शी करताना दिसत आहे. तर, आझम फलाह, मुनव्वर फारुकीला (Munawar Faruqui) एक बकरा भेट म्हणून देतो. कारण त्याला वाटते की, मुनव्वरने लॉकअपमध्ये अनेक बकऱ्या पाळल्या आहेत. तो म्हणते, 'तो जर चमचासारखा वागला, तर त्याची कुर्बानी दिली जाईल.’
मुनव्वर फारुकीने पायल रोहतगीला दिलं कडू कारलं
सायशा शिंदे हीने यावेळी पायल रोहतगीला ‘व्हीक्टीम कार्ड’ भेट म्हणून दिले. यावर पायल म्हणाली की, तिने कधीच व्हीक्टीम कार्ड खेळले नाही, यावरून तिचा खेळ किती कमकुवत आहे, हे दिसून येते. तेवढ्यात मुनव्वर फारुकी येतो आणि तिच्या हातात कारलं देतो आणि म्हणतो, 'हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, पण फारच कमी लोकांना आवडतं.'
पाहा व्हिडीओ :
यानंतर पायलचे मुनव्वर आणि अंजलीसोबत जोरदार वाद होतात. हा प्रोमो व्हिडीओ स्टार फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्यावर साठ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. नेटिझन्स कमेंट करून आपल्या आवडत्या स्पर्धकांचे कौतुक करत आहेत. कुणी मुनव्वरला सर्वोत्कृष्ट म्हणत आहे, तर कुणी पायल लॉकअप ट्रॉफी जिंकेल असा दावा करत आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)