(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar And Shraddha Kapoor : लता मंगेशकर अन् श्रद्धा कपूर यांच्यातील खास नातं!
अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) देखील यावेळी उपस्थित होती.
Lata Mangeshkar And Shraddha Kapoor : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी (6 जानेवारी) ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी सात वााजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) देखील यावेळी उपस्थित होती. श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर यांचे खास नातं होतं. जाणून घेऊयात नात्याबद्दल...
श्रद्धा कपूरचे आजोबा पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ होते. श्रद्धा ही मला मंगेशकर यांची नात आहे. श्रद्धाचे आजोबा हे शास्त्रिय गायक होते. त्यामुळे श्रद्धाला देखील गायनाची आवड आहे. श्रद्धानं अनेक चित्रपटांमध्ये गाणे गायले आहे.
पद्मिनी कोल्हापुरे आणि लता मंगेशकर यांचे नाते
श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावर लता मंगेशकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे देखील दिसत आहे. पद्मिनी या लता मंगेशकर यांची भाची आहेत.
View this post on Instagram
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar Funeral : लतादीदींसाठी शाहरुखने मागितली 'दुआ'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha