Lai Avadtes Tu Mala Serial Track : सानिकासमोर येणार सरकारचं सत्य; सरकारसोबतच्या गोड नात्याला लागणार दृष्ट, सईचा हेतू साध्य होणार?
Lai Avadtes Tu Mala Serial Track : सरकारच्या वाढदिवसापासून सईसमोर सरकार - सानिकाच्या प्रेमाचं सत्य आलं आहे. असं असलं तरीपण, सानिका अजून सरकारच्या एका सत्यापासून अनभिज्ञ आहे आणि ते म्हणजे, राजा म्हणजेच साखरगावच्या अप्पासाहेबांचा मुलगा सरकार आहे.
Lai Avadtes Tu Mala Serial Track : कलर्स मराठीवरील 'लय आवडतेस तू मला' मालिकेत सानिका आणि सरकारच्या आयुष्यातील संकटं काही संपण्याचं नाव घेत नाही. एकीकडे पंकजा आणि सर्वेशच्या कुरघोड्या सुरूच असताना आता त्यात सईच्या कटकारस्थानांची भर पडली आहे. सरकार-सानिकामध्ये दुरावा आणण्यासाठी सई एक संधी देखील सोडत नाहीये. सरकारच्या वाढदिवसापासून सईसमोर सरकार - सानिकाच्या प्रेमाचं सत्य आलं आहे. असं असलं तरीपण, सानिका अजून सरकारच्या एका सत्यापासून अनभिज्ञ आहे आणि ते म्हणजे, राजा म्हणजेच साखरगावच्या अप्पासाहेबांचा मुलगा सरकार आहे.
सई आता याचाच फायदा घेऊन दोघांमध्ये फूट पाडण्याचा डाव रचणार आहे. सानिका सरकारच्या गोड नात्याला सईची दृष्ट लागणार आहे. आता सईमुळेच सानिकासमोर सरकारचं सत्य येणार आहे. येत्या भागांमध्ये सरकारचं सत्य समोर आल्यावर राजा म्हणजेच, सरकारला सानिका जाब विचारताना दिसणार आहे. पंकजा, सर्वेश आणि सई यांच्या कपटी कारस्थानांमुळे सरकार - सानिकामध्ये अखेर दुरावा येणार आहे. सरकार सानिका आणि कळशी गाव सोडून जाणार? पुढे नक्की काय घडणार? हे बघणं रंजक असणार आहे.
View this post on Instagram
मकर संक्रांतीच्या दिवशी सरकारनं सानिकाला लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याचं सगळं सत्य त्यानं सांगितलं. पण ती चिठ्ठी पंकजानं बदलली, हे अजूनही सानिकाला माहिती नाही. तसेच, सई खेळत असलेली खेळी देखील अजून सरकारनं सानिकाला सांगितली नाही. सानिकावर हल्ला करणाऱ्या सईला राजा समजावतो की, तू जे काही करत आहेस, त्याला प्रेम नाही स्वार्थ म्हणतात. पंकजा सर्वेशला सरकारची चिठी दाखवून म्हणते, राजा कळशीचा आहे. नेमकं हे सई चोरून ऐकते. सानिकाला सई कडून चिट्ठी मिळते त्या चिट्ठीत सरकार आप्पा बरोबर फोटो आहे आणि त्यात राजा कळशीचा सरकार आहे आणि आप्पा धुमळांचा मुलगा आहे असं कळतं. सानिका चिडून राजाला जाब विचारायला जाते, सरकार समजावण्याचा प्रयत्न करतोय की, त्यानं सगळं खरं आधीच मकर संक्रांतीला सांगितलं आहे. पण सानिका मात्र त्याचं काहीचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही.
त्यामुळे नक्की काय घडणार? आता पुढे काय होणार? सानिका आणि सरकारच्या नात्यात मिठाचा खडा टाकण्यात सईला यश येणार? आपण खरं बोलतोय, हे सरकार सानिकाला पटवून देऊ शकेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं 'लय आवडतेस तू मला'च्या पुढच्या भागांमध्ये उलगडणार आहेत.