एक्स्प्लोर

Laapataa Ladies Box Collection Worldwide: 'लापता लेडीज'ची अवघ्या तीन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई, भारतातही बॉक्स ऑफीसवर जमवला बक्कळ गल्ला

Laapataa Ladies Box Collection Worldwide:  लापता लेडीज हा चित्रपट 1 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात 6.54 कोटींची कमाई केली आहे.

Laapataa Ladies Box Collection Worldwide:  किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित 'लपता लेडीज' (Laapataa Ladies) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) दबदबा निर्माण केला आहे. चित्रपटाची कथा आणि पात्र प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दररोज करोडोंची कमाई करत असल्याचं पाहायला मिळतंय. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा दबदबा तर आहेच, पण जगभरातही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

'लापता लेडीज' 1 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि रिलीजच्या तीन दिवसांतच चित्रपटाने बक्कळ कमाई केली. रिपोर्ट्सनुसार, 'लापता लेडीज'चे बजेट 4 ते 5 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने जगभरात 6.54 कोटी रुपयांची कमाई करून आपले बजेट संपवले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक किरण रावने स्वतः कलेक्शन पोस्टर शेअर करून ही माहिती दिली आहे.

लापता लेडीजचा भारतातील गल्ला

'लापता लेडीज'ने भारतात देखील बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केलाय. या चित्रपटाने आतापर्यंत चार दिवसांत एकूण 4.21 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 1.7 कोटींची कमाई केली होती, तर चौथ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन थोडे कमी आहे.

लापता लेडीजची स्टारकास्ट

आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली लापता लेडीज या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलीये. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केलंय. या चित्रपटाच्या माध्यमातून किरण राव बऱ्याच काळानंतर दिग्दर्शनाकडे वळली आहे.  रवी किशन, नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि छाया कदम या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.

काय आहे सिनेमाची गोष्ट?

लापता लेडीज ही दोन महिलांची गोष्ट आहे. नवीनच लग्न झालेला दीपक आपल्या बायकोला घेऊन त्याच्या गावी जातो. पण घरात नवरीचा पदर उचलला की सगळ्यांचेच डोळे उघडे राहतात. फूल कुमारीशी लग्न करायला गेलेला दीपक, पुष्पाला घरी घेऊन येतो. फुल कुमारी कुठे आहे आणि पुष्पा कोण आहे याचे रहस्य सोडवून या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

ही बातमी वाचा : 

Laapataa Ladies Box Office Collection Day 2: वीकेंडला 'लापता लेडिज'ची बंपर कमाई! दुसऱ्या दिवशी पर केला कोट्यावधींचा आकडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madras High Court : 'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Clash Market loss : नागपूर हिंसाचारात तीन दिवसात सुमारे 400 कोटी रुपयांचंCBSE Pattern in SSC Board : 'पॅटर्न' बदलणार, सीबीएसई येणार ; अभ्यासक्रमाच कोणते बदल होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 21 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madras High Court : 'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
Nagpur News: चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडी जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडीचा जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Embed widget