KRK Slams Paresh Rawal: 'जो माणूस स्वतःची लघवी पिऊ शकतो, तो पब्लिसिटीसाठी...'; परेश रावल यांच्या 'हेरा फेरी 3' स्टंटवर भडकला 'हा' प्रसिद्ध खान
KRK Slams Paresh Rawal: परेश रावल यांच्या 'हेरा फेरी 3' स्टंटवर भडकला प्रसिद्ध खान. म्हणाला की, जो माणूस स्वतःची लघवी पिऊ शकतो, तो पब्लिसिटीसाठी काहीही करू शकतो.

KRK Slams Paresh Rawal: 'हेरा फेरी 3'च्या (Hera Pheri 3) घोषणेपासूनच अनेक चर्चांना उधाण आलेलं. त्यानंतर आधी सायनिंग अमाउंट घेतलेले बाबू भैय्या फेम परेश रावल (Paresh Rawal) अचानक सिनेमा आणि त्यातली भूमिका म्हणजे, गळ्यातला फास असल्याचं बोलू लागले. त्यात त्यांनी स्वतःच अचानक ट्विटरवर जाहीर करुन टाकलं की, मी या सिनेमातून बाहेर पडतोय आणि त्यानंतर सुरू झाला प्रचंड मोठा गदारोळ. अनेकांनी बाबू भैय्या नाहीतर 'हेरा फेरी 3' पाहण्यात अर्थच नाही, असं थेट सांगून टाकलं. तर काहींनी परेश रावल यांना समजावण्याचे प्रयत्न सुरू केले. अशातच अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊसनं त्यांना 25 कोटींची नोटीस धाडली. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, पण अचानक एक दिवस परेश रावल यांनी ट्विटरवर जाहीर केलं की, ते 'हेरा फेरी 3'मध्ये दिसणार आहेत. यावरुन सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर प्रसिद्ध खाननं ट्वीट करुन परेश रावल यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम्ही ज्या प्रसिद्ध खानबाबत सांगत आहोत, तो खान म्हणजे, केकेआर. केआरके त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि स्पष्टवक्त्येपणासाठी ओळखला जातो. अनेकदा केकेआर बऱ्याच विषयांवर आपलं मत मांडत असतो. अशातच सध्या केकेआर परेश रावल यांच्याबद्दलच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, 'हेरा फेरी 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार असून काही दिवसांतच त्याची शुटिंग सुरू होणार आहे. त्यासाठी परेश रावल यांनी अलीकडेच संपूर्ण स्टारकास्टसोबत एक पब्लिसिटी स्टंट केलेला. यादरम्यान, परेश रावल यांनी सांगितलेलं की, ते बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले आहेत आणि त्यांना ही फिल्म अजिबात करायची नाही. आता परेश रावल यांनी हा चित्रपट करण्यास सहमती दर्शविल्यानंतर, केआरकेनं त्यांना फटकारलं आहे. काही काळापूर्वी परेश यांनी सांगितलं होतं की, एकदा ते आजारी होते, तेव्हा त्यांनी स्वतःचीच लघवी प्यायचे... त्याचा त्यांना फायदा झाला असून त्यानंतर ते ठणठणीत बरे झालेले.
Paresh rawal said in his podcast that all the problems are solved and now he is back in #HeraPheri3. #DrKRK said at the time of controversy only that it’s just a publicity stunt. Paresh can’t leave this film. And Akshay can’t take legal action against Rawal. Nobody knows…
— KRK (@kamaalrkhan) June 29, 2025
केकेआरनं ट्वीटमध्ये काय लिहिलेलं?
केआरकेनं लिहिलेलं की, जो माणूस आयुष्यात स्वतःचं मूत्र पिऊ शकतो, तो प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतो. ते म्हणाले की, "परेश रावल यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की, सर्व समस्या सुटल्या आहेत आणि आता ते #HeraPheri3 मध्ये परतले आहेत. #DrKRK यांनी वादाबाबत बोलताना म्हटलं की, हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे. परेश हा चित्रपट सोडू शकत नाही. आणि अक्षय, परेश रावल यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. माझ्यापेक्षा बॉलिवूडला चांगलं कोणीही जाणत नाही, म्हणून जेव्हा मी काही बोलतो, तेव्हा लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. जो माणूस स्वतःची लघवी पिऊनं आपलं आयुष्य जगतोय, तो प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतो. @SirPareshRawal हा बॉलिवूडचा सर्वात मोठा नाटक आहे. तुम्ही त्याला मेल राखी सावंतही (Rakhi Sawant) म्हणू शकता."
केआरकेची ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. दरम्यान, परेश रावल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यावर परेश रावल कधी भाष्य करतील हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























