कोकण हार्टेड गर्ल आई होणार? कुणालच्या एका वाक्याने सोशल मीडियावर धुमाकूळ,संक्रांत स्पेशल पोस्ट चर्चेत
अंकिताने कुणाल सोबत शेअर केलेल्या रीलमुळे सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगलीय ती अंकिता वालावलकर आणि कुणालच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची.

Ankita walawalkar: आपल्या कोकणी भाषेतील कंटेंटवरून लोकप्रिय झालेली कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. नुकतंच लग्नानंतर तिनं तिची पहिली संक्रांत साजरी केली. अंकिताने सासूबाईंच्या इच्छेप्रमाणे गावी जवळपास 350 बायकांना बोलवत संक्रांतीचे वाण दिलं. याविषयी तिने एक खास व्हिडिओ शेअर करत तिच्या पहिल्या मकर संक्रांतीची झलक दाखवली. या कार्यक्रमासाठी अंकिताने पारंपरिक हलव्यांचे दागिने परिधान करत काळा रंगाचा लेहंगा परिधान केला होता. दरम्यान अंकिताने कुणाल सोबत शेअर केलेल्या रीलमुळे सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगलीय ती अंकिता वालावलकर आणि कुणालच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची. या व्हिडिओत अंकीता काय म्हणालीय पाहूया ..
संक्रांत स्पेशल पोस्ट चर्चेत
आपली पहिली संक्रांत साजरी करताना अंकिता वालावलकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्यात ती म्हणताना दिसतेय " मी कुणाला सांगितला आहे की हा मी ऑर्गनाईज केलेला शेवटचा इव्हेंट असू दे . यावर कुणाल म्हणतो' चोर ओटीचा इव्हेंट मी करणार ' यावर अंकिता म्हणते "मला तेच पाहिजे आहे .नाहीतर डोहाळ जेवणाला मी अशी असेल की तिथे फुल लावा इथे डेकोरेशन करा .." अंकिताचा नेहमीप्रमाणेच गमतीशीर स्वभाव आणि तिचे हावभाव, नकला प्रेक्षकांना आवडतात. अंकिता आणि कुणालचा हा संवादही गमतीशीर स्वरूपाचा होता. अंकिताने किंवा कुणालने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, तिचे हावभाव आणि कमेंट्सने चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
अंकिताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जणांनी अंकिताच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचं म्हटलं. एका युजरने म्हटलं "एकंदरीत बोलण्यावरून असं दिसतंय की दोनाचे तीन होणार लवकरच "काहींनी ती खूप गोड असल्याचं म्हटलंय.तिचे दागिने ड्रेस आणि संपूर्ण समारंभ चाहत्यांना आवडला आहे.























