Kirron Kher Blood Cancer: खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर
अनुपम खेर यांच्या पत्नी आणि चंदीगढच्या भाजप खासदार यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
![Kirron Kher Blood Cancer: खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर Kirron Kher Suffering From Blood Cancer Veteran Bollywood actress undergoing treatment Mumbai Kirron Kher Blood Cancer: खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/01/ef6cba15164844de6658a4261f39e953_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या बाबत खेर कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बुधवारी चंदीगढ भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी पत्रकार परिषदेचे आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला किरण अनुपस्थित होत्या. किरण खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यावेळी अरुण यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती दिली. गेल्यावर्षी किरण खेर यांना या आजाराचं निदान झालं होतं. उपचारानंतर किरण खेर यांची तब्येत ठिक असून त्या मुंबईमध्ये आहेत अशी माहितीही अरुण सूद यांनी दिली.
गेल्या वर्षी नोव्हेंबर माहिन्यात किरण खेर चंदीगढमध्ये असताना त्यांना या आजाराबाबत कळालं. त्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूच ऑफ मेडिकल अॅन्ड एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये (PGIMER) मेडिकल टेस्ट केल्यानंतर त्यांना मल्टीपल मायलोमा याचे निदान झाले. त्यानंतर त्यांना 4 डिसेंबर रोजी उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं.
सूद म्हणाले, चार महिने उपचार घेतल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही पण त्यांना उपचारासाठी नियमितपणे रुग्णालयात जावं लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)