खेसारी लाल अन् आकांक्षा पुरी वर्कआउट व्हिडीओमुळे ट्रोल, नेटकरी म्हणाले अश्लील, अखेर अभिनेत्यानं सोडलं मौन
Akanksha Puri Khesari lal Yadav Workout Video : भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी यांचा वर्कआउट व्हिडीओ समोर आला होता, ज्याला नेटकऱ्यांनी अश्लील म्हणत ट्रोल केलं होतं.
Khesari lal Yadav on Workout Video With Akanksha Puri : भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यामुळे त्याला भोजपुरी सिनेमातील 'ट्रेंडिंग स्टार' असंही म्हटलं जातं. आता पुन्हा एकदा ट्रेंडिग स्टार भोजपुरी अभिनेता खेसारी लाल चर्चेत आला आहे. अलिकडेच अभिनेता खेसारी लाल यादव आणि टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. खेसारी लाल आणि आकांक्षा पुरीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या व्हिडीओला अश्लील बोलत नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. यानंतर आता अभिनेता खेसारी लालची प्रतिक्रिया समोर आली आहे.
खेसारी लाल अन् आकांक्षा पुरी वर्कआउट व्हिडीओमुळे ट्रोल
भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव आणि टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत काम केल्यामुळे चर्चेत आहे. दोघेही बॅक टू बॅक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम करत आहेत. ते सोशल मीडियावर एकत्र अनेक व्हिडिओ आणि फोटोही शेअर करत आहेत. ते एकमेकांच्या सहवासाचा खूप आनंद घेत आहेत. काजल रघवानीनेही त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. काही दिवसांपूर्वी आकांक्षा आणि खेसरीचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये दोघी एकत्र लटकत आणि व्यायाम करत होत्या. यामुळे लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि व्हिडिओला अश्लील म्हटले. यावर आता खेसारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वर्कआऊट व्हिडीओला नेटकरी म्हणाले अश्लील
खेसारी लाल यादव अलिकडेच एका स्टेज शोमध्ये गेला होता, तिथे त्याने व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. या कार्यक्रमातील खेसारी लालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये खेसारी लाल आकांक्षा पुरीसोबत हँग आउट आणि वर्कआउट करतानाच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. आकांक्षा आणि खेसारीच्या व्हायरल वर्कआऊट व्हिडीओवर खेसारी म्हणाला की, आमचा वर्कआऊट व्हिडीओ सर्वांनी पाहिला, त्यांना तो अश्लील वाटला, पण मला ती कसरतचं वाटत होती.
अखेर अभिनेत्यानं सोडलं मौन
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओवर काय म्हणाला खेसारी लाल?
खेसारी लाल वर्कआऊट व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हणतो की, 'मी आणि आकांक्षा पुरी एका जिममध्ये प्रशिक्षण घेत असल्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. सगळ्यांनी पाहिलं असेल. प्रत्येकाला हे खूप अश्लील वाटलं. ते मला वर्कआऊटच वाटत होतं. मला, ते माझ्या जिम वर्कआऊटप्रमाणे वाटलं, म्हणून मी ते केलं. आता लोकांना चुकीचं वाटत असेल तर त्यात माझं काय?' यानंतर त्याने 'हम संतोष पागल ना है' हा लोकप्रिय व्हायरल रीलमधील डायलॉग मारला.
खेसारी लाल-आकांक्षा पुरीचा व्हायरल वर्कआऊट व्हिडीओ
#akankshapuri & #khesarilalyadav doing workout at the gym 😂 pic.twitter.com/U7Kar9L78R
— $@M (@SAMTHEBESTEST_) November 14, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :