Pushpa 2 Film : पुष्पा-2 अर्थात पुष्पा-द रुल या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा चालू आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहाद फासील यांच्या कामाचे सिनेरसिक कौतुक करत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सगळे रेकॉर्ड मोडताना दिसतोय. दरम्यान, एकीकडे तुफान प्रतिसाद मिळत असताना हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राजपूत समजाच्या नेत्यांनी खलनायकाच्या शेखावत या नावावर आक्षेप घेतला असून हा क्षत्रियांचा अपमान आहे, असं म्हटलंय. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


नेमका वाद काय? आक्षेप कशावर घेण्यात आला? 


राजपूत समाजाचे नेते राज शेखावत यांनी पुष्पा-2 चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी या चित्रपटाबाबतचे आपले आक्षेप नोंदवले आहेत. या चित्रपटातील भवरसिंह शेखावत या पात्रावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. हे पात्र फहाद फॉसील या अभिनेत्याने साकारलेले आहे. या पात्रामुळे शेखावत समाजाची नकारात्मक प्रतिमा उभी राहात आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या चित्रपटातील शेखावत हा शब्द सगळीकडून काढून टाकावा, अशी मागणीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. हे नाव न हटवल्यास आगामी परिणाम आणि पडसादांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


शेखावत नेमकं काय म्हणाले? 


"पुष्पा-2 या चित्रपटात शेखावत नावाचे नकारात्मक भूमिका साकारणारे पात्र आहे. हा क्षत्रियांचा अपमान आहे. करणी सेनेच्या सैनिकांनो तयार राहा. या चित्रपटाच्या निर्मात्याला लवकरच धडा शिकवला जाईल," असं शेखावत यांनी म्हटलंय. तसेच या चित्रपटात शेखावत समाजाला मुद्दामहून नकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हा क्षत्रियांचा अपमान आहे, असंही त्यांनी म्हटलंय.


चित्रपटातून शेखावत हे नाव लवकरात लवकर काढून टाकावे अन्यथा करनी सेना कठोर भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे आता चित्रपटाचे निर्माते नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा :


पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!


अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, आता मलायका पुन्हा प्रेमात? 'या' कुल बॉयसोबतचा फोटो समोर,  मिस्ट्रीमॅन नेमका कोण? 


Tamannaah Bhatia : टायगर प्रिंट अन् ग्लॅमरस लूक, तमन्ना भाटीयाचे फोटो चर्चेत!