मुंबई : सध्या अभिनेता अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असणाऱ्या पुष्पा-2 या चित्रपटाची सगळीडेच चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांची चित्रपटगृहांवर झुंबड उडाली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा अभिनय अनेकांना आवडला आहे. मात्र याच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार्या तारक पोनप्पाचीही तेवढीच चर्चा होत आहे. हा तारक पोनप्पा नेमका कोण आहे? असं विचारलं जातंय.
पुष्पा-2 हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाची सिनेरसिकांत चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. फक्त तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल 621 कोटी रुपये जिंकले आहेत. या चित्रपटातील सहकलाकारांनाही तेवढाच दमदार अभिनय केला आहे. तारक पोनप्पा हा अभिनेताही या चित्रपटात सहाय्यक कलाकार म्हणून झळकलेला आहे. मात्र त्याच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. स्क्रीनवर जेवढी संधी मिळाली? त्या संधीचं त्याने सोनं करून दाखवलं आहे.
तारक पोनप्पा याचे पुष्पा-2 या चित्रपटातील काम पाहून लोक अचंबित तर झालेच आहेत. पण तो हुबेहूब क्रिकेटर कृणाल पांड्यासारखा दिसत आहे, असं चाहत्यांना वाटत आहे. त्याचा लूक हा हुबेहुब कृणाल पांड्यासारखा असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तसे काही फोटोही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तारक पोनप्पा आहे तरी कोण?
तारक पोनप्पाने या चित्रपटात कोगतम बुग्गा रेड्डी हे पात्र साकारले आहे. कोगतम रेड्डी हा केंद्रीय मंत्री कोगतम वीरा प्रताप रेड्डी (जगपति बाबू) याचा भाचा दाखवण्यात आलेला आहे. या चित्रपटात त्याचा एक लूक अनेकांना आवडला आहे. एका सिनमध्ये त्याने बांगड्या, नथ, हार, कानातील डूल परिधान केल्याचं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटातील हा सिन अनेकांना आवडलेला आहे. त्यामुळेच तारक पोनप्पा याच्या पात्राची सध्या सगळीकडे चर्चा होत असून त्याच्या कामाचीही प्रशंसा केली जात आहे.
हेही वाचा :