India vs Australia 3rd Test : ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली. पर्थ कसोटी जिंकून टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली पण दुसऱ्या सामन्यात कांगारू संघाने बरोबरी साधली. भारताची फलंदाजी दुसऱ्या कसोटीत सपशेल अपयशी ठरली आणि दोन्ही डावात 180 धावांपर्यंत मजल मारणे कठीण झाले. 10 गडी राखून या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील भारताचा मार्ग कठीण केला. आता तिसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल सतत चर्चा होत आहे.


भारताने पर्थ कसोटी जिंकली जिथे कर्णधारपदाची जबाबदारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या हातात होती. पहिला कसोटी सामना न खेळलेल्या रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केले. कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्हीत तो अपयशी ठरला. गेल्या 10 कसोटी डावांमध्ये त्याने केवळ एकदाच पन्नाशीचा टप्पा ओलांडला आहे. दुसरी मोठी धावसंख्या 23 धावांची होती, जी सलामीवीर म्हणून अतिशय लाजिरवाणी आहे. कसोटीत धावा काढण्यासाठी सतत धडपडणारा रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यात स्वत:ला बाहेर बसवण्याचा निर्णय घेऊ शकेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.




रोहित शर्मा बसणार तिसऱ्या कसोटीतून बसणार बाहेर?


रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचीही मागणी होत आहे. पण रोहित संघाच्या हितासाठी धाडसी पावले उचलू शकतो का? सध्या तसे करणे शक्य नाही कारण रोहितला जरी स्वतःला वगळायचे असले तरी गौतम गंभीरला हे मान्य होणार नाही. भारताकडे जसप्रीत बुमराहच्या रूपाने रोहितच्या कर्णधारपदाचा पर्याय आहे पण त्याची जागा घेण्यासाठी दुसरा फलंदाज नाही. आणि दुसऱ्याकडे भारतीय संघाकडे एकही अनुभवी फलंदाज नाही.


भारताची प्लेइंग 11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी किंवा हर्षित राणा किंवा आकाश दीप, मोहम्मद सिराज.


हे ही वाचा -


Mohammed Shami-Rohit Sharma : विषय निघताच रोहित बोलला, पण शमी भडकला; टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर?


Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा