Karisma Kapoor First Post After Ex Husband Death: संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली...
Karisma Kapoor First Post After Ex Husband Death: करिश्मा कपूरनं तिचा माजी पती संजय कपूरच्या निधनानंतर तिची पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीनं काय लिहिलंय? ते सविस्तर जाणून घेऊयात

Karisma Kapoor First Post After Ex Husband Death: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor) घटस्फोटीत पती संजय कपूर यांचं 12 जून रोजी इंग्लंडमध्ये निधन झालं. पोलो सामना खेळत असताना संजय कपूर (Sunjay Kapur) यांनी मधमाशी गिळली आणि पुढे काही सेकंदातच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मृत्यूच्या आठ दिवसांनी संजय कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी करिश्मा कपूर आपल्या मुलांसह संजय कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होती. अशातच आता आपल्या घटस्फोटीत पतीच्या निधनानंतर करिश्मा कपूरनं पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
गेले काही दिवस करिश्मा कपूरसाठी खूप कठीण होते. तसेच, अभिनेत्रीनं 25 जून रोजी तिचा 51वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी तिच्या सर्व चाहत्यांनी तिला वाढदिवलाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच आता करिश्मानं सोशल मीडियावर पोस्ट करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. करिश्मा कपूरनं तिच्या घटस्फोटीत पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
करिश्मा कपूरनं पोस्टमध्ये काय लिहिलं?
करिश्मा कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर लिहिलेलं की, "तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार..." यासोबतच तिनं रेड हार्ट इमोजी आणि हात जोडलेला इमोजीदेखील पोस्ट केला आहे. तिनं तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी ही पोस्ट शेअर केली आहे.

यापूर्वी करिश्मा कपूरनं 11 जून रोजी शेवटची पोस्ट शेअर केली होती. अशाप्रकारे, तिनं तिचा माजी पती संजय कपूरच्या निधनानंतर पहिली सोशल मीडिया पोस्ट केलीय. 12 जून रोजी इंग्लंडमध्ये संजय कपूरच्या निधनानंतर, 19 जून रोजी दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर, संजय कपूर यांच्यासाठी दोनदा प्रार्थना सभा घेण्यात आल्या. करिश्मा कपूर तिचा घटस्फोटीत पती संजय कपूरच्या अंत्यसंस्कारासाठी आणि दोन्ही प्रार्थना सभांसाठी तिच्या मुलांसह दिल्लीत पोहोचली होती.
लग्नाच्या 13 वर्षांनी करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट
2003 मध्ये करिश्मा कपूरनं उद्योगपती संजय कपूर यांच्याशी आपली लग्नगाठ बांधलेली. दोघांनाही एक मुलगी आणि एक मुलगा आहे. लग्नानंतर काही वर्षांच्या सुखी संसारानं करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या नात्यात तणाव वाढला आणि दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. यावेळी दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. करिश्मासोबतचं लग्न हे संजय कपूर यांचं दुसरं लग्न होतं. यापूर्वी त्यांनी नंदिता महतानीसोबत पहिलं लग्न केलं होतं. करिश्मा कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























