(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kapil Sharma and Sunil Grover Net Worth : सुनिल ग्रोव्हरच्या एकूण संपत्तीपेक्षा अधिक टॅक्स भरतो कपिल शर्मा!
Kapil Sharma and Sunil Grover Net Worth : कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्या संपत्तीत बराच फरक आहे. कपिल शर्मा जेवढा कर भरतो, तेवढी संपत्तीदेखील सुनिल ग्रोव्हरकडे नाही.
Kapil Sharma and Sunil Grover Net Worth : कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या शोमुळे चर्चेत असतो. कपिल शर्माने छोट्या पडद्यावरून आता ओटीटीवर आपला मोर्चा वळवला आहे. आता 'द ग्रेट इंडियन शो'चा (The Great Indian Kapil Show) दुसरा सीझन नेटफ्लिक्स (Netflix) रिलीज होणार आहे. छोट्या पडद्यावर कॉमेडी शोचा बादशाह असलेल्या कपिल शर्माने नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' लाँच केला. पहिल्या सीझनच्या 13 एपिसोडनंतर शोने ब्रेक घेतला होता. आता, शोचा दुसरा सीझन येणार आहे. या शोच्या माध्यमातून सुनिल ग्रोव्हरने (Sunil Grover) पुन्हा एकदा कपिलसोबत काम करण्यास सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळात दोघांमध्ये टोकाची भांडणे झाली. त्यामुळे दोघांमध्ये बेबनाव होता.
सुनिल ग्रोव्हरने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' साठी सुनिल ने किती मानधन घेतले, याची चर्चा रंगली होती. 'कोइमोई'च्या वृत्तानुसार, सुनिल ग्रोव्हरने शोच्या एका एपिसोडमधून 25 लाख रुपये कमावले. तर 13 एपिसोडची एकूण कमाई 3.25 कोटी रुपये होती. तर कपिल शर्माने 2024 मध्ये 26 कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्यानुसार कपिल शर्माने सुनिल ग्रोव्हरच्या शोच्या कमाईच्या तब्बल आठ पटीने कर भरला आहे.
सुनिल ग्रोव्हर हा चांगला अभिनेता आहे. त्याने वेब सीरिज, चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. शाहरुखची मुख्य भूमिका असलेल्या जवान चित्रपटासाठी त्याने 75 लाख रुपयांचे मानधन घेतले असल्याची चर्चा होती. सुनिल ग्रोव्हरची एकूण संपत्ती ही 21 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते. आता, कपिल शर्माच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्याचे मानधन वाढले असल्याची शक्यता आहे.
मात्र, कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्या संपत्तीत बराच फरक आहे. कपिल शर्मा जेवढा कर भरतो, तेवढी संपत्तीदेखील सुनिल ग्रोव्हरकडे नाही.
कपिल सुनीलमध्ये झाला होता वाद...
सुनिल आणि कपिलमध्ये पूर्वीपासून खूप घट्ट मैत्री होती. पण मार्च 2017 मध्ये दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर त्यांनी काही वर्ष एकत्र काम केले नाही. एकमेकांना त्यांनी नेहमी टाळले. पण त्यानंतर दोघेही 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये एकत्र आले. दोघांना एकत्र आणण्यात सलमान खानने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दोघेही सलमानच्या एका पार्टीत एकत्र दिसले होते.
सुनिलने याआधी छोट्या पडद्यावर कपिलच्या शोमध्ये गुत्थीची भूमिका साकारली होती. या व्यक्तीरेखेला चांगलीच लोकप्रिय झाली होती.