Kantara Plagiarism Row : ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) चित्रपट 'कांतारा' (Kantara) बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत असतानाच दुसरीकडे मात्र या चित्रपटाशी संबंधित वाद निर्मात्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. निर्मात्यांवर या चित्रपटातील गाणं चोरल्याचा आरोप आरोप आहे. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. केरळस्थित म्युझिक बँड थक्कुडम ब्रिजच्या (Thaikkudam Bridge) तक्रारीनंतर कोझिकोड सत्र न्यायालयाने 'कांतारा'च्या निर्मात्यांना सिनेमा आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर 'वराह रूपम' (Varaha Roopam) गाण्यापासून रोखणारा आदेश जारी केला आहे. 


कांतारा निर्मात्यांचा त्रास वाढला


लोकप्रिय इंडी म्युझिक बँडने यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी असे लिहीले होते की, 'कांतारा'च्या निर्मात्यांनी 'नवरसम' गाण्याची चोरी केली आहे. यावर आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेले 'नवरसम' हे गाणे 2015 मध्ये रिलीज झाले होते. तसेच कांतारा चित्रपटातील 'वराह रूपम' आणि 'नवरसम' हे गाणे एकच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, ते चित्रपटात वेगळे दाखवण्यात आले आहेत."






निर्मात्यांवर गाणी चोरल्याचा आरोप


थक्कुडम ब्रिजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, 'प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कोझिकोडे यांनी निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, अॅमेझॉन, यूट्यूब, स्पॉटीफाय, विंक म्युझिक आणि इतर प्लॅटफॉर्मवर 'कांतारा' चित्रपटातील वराह रुपम हे गाणे परवानगीशिवाय वाजविण्यास मनाई केली आहे. 


थक्कूडम ब्रिजने यापूर्वीच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते, 'आम्ही आमच्या सहकाऱ्यांना हे स्पष्ट करू इच्छितो की आमच्या नवराम आणि वराह रूपमच्या ऑडिओमध्ये अनेक समानता आहेत. ज्यामुळे कॉपीराइट कायद्याचे थेट उल्लंघन आहे. त्यामुळे तो तयार करणाऱ्या संघावर कायदेशीर कारवाई करू. या सामग्रीवर आमच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीमने ओरिजनल गाणे म्हणून त्याचा प्रचार केला आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना याला पाठिंबा देण्याची विनंती करतो. आम्ही आमच्या सर्व कलाकारांना आवाहन करतो की त्यांनी संगीत सुरक्षित ठेवण्यासाठी आवाज उठवावा.


'कांतारा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करून इतिहास रचत आहे. कन्नड भाषेत बनवलेला हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कमाई पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यानंतर, निर्मात्यांनी हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदी भाषेतदेखील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केला.    


महत्वाच्या बातम्या : 


Kantara OTT Release Date:  कांतारा चित्रपट 4 नोव्हेंबरला ओटीटीवर होणार रिलीज? पाहा काय म्हणाले निर्माते....