दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. अजित पवारांसह 'मविआ'च्या महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारनं काढली, मात्र मिलिंद नार्वेकरांच्याच सुरक्षेत वाढ, तर जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा देखील जैसे थेच


2. किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर कथित एसआरए घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी, आज पुन्हा चौकशी होणार


3. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाची सरकारने दखल न घेतल्यानं आज उस्मानाबाद बंद, पीकविमा आणि नुकसानभरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक


4. शिंदे गटाचा पहिला मेळावा आज नंदूरबारमध्ये, दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा 


5. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढायचं का?, उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेणार, 31 ऑक्टोबरपासून ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका 


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 29 ऑक्टोबर 2022 : शनिवार



6. एसटीची दिवाळी आनंदात! मुंबई विभागातून 5 दिवसांत अडीच कोटींचं उत्पन्न, भाऊबीजेच्या दिवशी 55 लाखांहून अधिकचं उत्पन्न


7. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात प्रतापगडावर मशाल महोत्सव, शेकडो मशालींच्या प्रकाशानं उजळला शिवरायांचा गड


किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. राज्यभरातील चारशे गडांच्या संवर्धनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला.. या मशालींमुळे प्रतापगड प्रकाशमय झाला होता.. या महोत्सवावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली... प्रतापगड आणि पंचक्रोशीतील आबालवृद्धांनी या महोत्सवासाठी गर्दी केली होती...जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणात किल्ले प्रतापगड दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं..


8. दिल्लीत मोठा विमान अपघात टळला, बंगळुरुकडे निघालेल्या इंडिगो विमानाच्या इंजिनात आग, वेळीच विमान रोखल्याने 184 प्रवासी बचावले


दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडलीय. उड्डान घेतेवेळीस ही आग लागल्याची प्रशमिक माहिती.  घडलेल्या प्रकारामुळे  इंडिगो विमानाला दिल्ली विमानतळावरच थांबवण्यात आलं. 


9. ब्रिटनमध्ये आढळले कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट, सातशेहून अधिक जणांना लागण, दोन्ही व्हेरियंटवर लशीचा कोणताही परिणाम नाही


10. सोशल मीडिया यूजर्स आता ट्विटर, फेसबुकची सरकारकडे तक्रार करु शकणार, केंद्र सरकारकडून आयटी नियमात बदल, येत्या 3 महिन्यात समिती स्थापन करणार