Kantara: सध्या 'कांतारा' (Kantara)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉक्स  ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. आता कांतारा चित्रपटाला मिळालेल्या यशाबाबत अभिनेता ऋषभ शेट्टीनं प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाला ऋषभ शेट्टी? 


ऋषभ शेट्टी म्हणाला, “हा चित्रपट माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातेसंबंधांवर आधारित आहे आणि कर्नाटकातील लोककथांचा एक भाग आहे. त्यामुळे मला हा चित्रपट माझ्या मातृभाषेत लोकांसमोर मांडायचे होता. पण नंतर चित्रपट इतर भाषांमधील व्हर्जनमध्ये रिलीज करावा अशी मागणी लोक करत होते. ट्विटरवर लोक मला 'हिंदी, तेलगू, तमिळमध्ये रिलीज करा, डू इट पॅन इंडिया, असा संदेश देत होते.'


'हा चित्रपट लोकांना इतका आवडेल याची आपेक्षा नव्हती. त्यामुळेच हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब केलेला नाव्हता. आता भाषेचा अडथळा नाही. हा भारतीय सिनेमा आहे, म्हणूनच कांताराला खूप प्रेम मिळत आहे. परदेशातील लोकही हे पाहत आहेत, याचा खूप आनंद वाटतो. अनेक लोकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचे खूप प्रमोशन केले आहे.' असंही ऋषभनं सांगितलं.


ऋषभ शेट्टी म्हणाला की, 'हे सर्व यश मिळवण्यासाठी 18 वर्षे मेहनत केली आहे आणि हे एका रात्रीत घडलेले नाही.  मी फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी काम केलेले नाही. मल्याळम, तेलगू आणि इतर देशांतील सर्व भाषांमधील प्रेक्षकांचा मी आभारी आहे.'


'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. 'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. 


कांतारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  तर जगभरात या चित्रपटानं 170 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.  कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Kantara Movie: 'अंगावर शहारे आले'; कांतारा चित्रपटाचं अल्लू अर्जुननं केलं कौतुक