Kantara OTT Release Date: सध्या 'कांतारा' (Kantara) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉक्स कोट्यवधींची कमाई केली आहे. धनुष, अनुष्का शेट्टी (Anushka Shetty), प्रभास (prabhas) ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुननं देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट चार नोव्हेंबरला रिलीज होणार असं म्हटलं जात होतं. पण आता यावर निर्माता कार्तिक गौडा (Karthik Gowda) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कार्तिक गौडा यांचं ट्वीट
निर्माता कार्तिक गौडा यांनी एक ट्वीट शेअर करुन कांताराच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'ही चुकीची बातमी आहे. जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल तेव्हा आम्ही तुम्हाला माहिती देऊ. पण हा चित्रपट चार नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.'
कांतारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटानं 170 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.
'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. ज्यामध्ये ऋषभ शेट्टीने लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. अनेक कलाकांनी कांतारा या चित्रपटाचं कौतुक केलं. चित्रपटाने IMDb वर 9.5 रेटिंग मिळवून विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम ‘KGF 2’च्या नावावर होता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Kantara Movie: 'अंगावर शहारे आले'; कांतारा चित्रपटाचं अल्लू अर्जुननं केलं कौतुक