एक्स्प्लोर

Kangana Ranaut : स्वत:बद्दल ‘गुगल’वर सर्च केल्यानंतर कंगना रनौत नाराज; म्हणाली, "मी दहा वर्षाखाली जे बोलले..."

कंगनाने स्वत:चे नाव गूगलवर टाकून पाहिले. नाव टाकल्यानंतर नेमकी काय माहिती आली ही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत सांगितले आहे.

Kangana Ranaut Post : कंगनाला मुळातच बाॅस लेडी म्हणून ओळखले जाते. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायमच चर्चेत असते. कोणताही राजकीय, सामाजिक मुद्दा सोशल मीडियावर व्हायरल होणारी एखादी पोस्ट कंगना त्यावर आवर्जून बिनधास्तपणे व्यक्त होते. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात  सक्रिय असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना नाव न घेता टार्गेट करत असते. 

अशात कंगनाने स्वत:चे नाव गुगलवर टाकून पाहिले. नाव टाकल्यानंतर नेमकी काय माहिती आली ही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत सांगितले आहे. कंगनाने या पोस्टद्वारे तिच्याबद्दल ‘गुगल’ या सर्च इंजिनवर दाखवल्या जाणाऱ्या माहितीवर आक्षेप घेतला आहे. इतर कलाकारांविषयी जेव्हा गुगलवर सर्च केलं जातं, तेव्हा त्यांच्या कामाविषयी माहिती दिसते, मात्र स्वत:विषयी केलं तर वेगळंच काहीतरी दिसतं, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

काय आहे कंगनाची पोस्ट

"दुसऱ्या अभिनेत्रींविषयी गुगलवर काही सर्च केले तर , त्यांच्या कामाबद्दल तसेच त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दलची माहिती दिसते आणि माझ्या (अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिक, निर्माती असूनही) गुगल पेजवर दहा वर्षांपूर्वी कोणी काय म्हटलं होतं किंवा दहा वर्षांपूर्वी मी केलेल्या वक्तव्याचा काय अर्थ आहे हे सर्व दिसतंय. ही माझ्या आजच्या दिवसाची स्टोरी" असे तिने लिहिले आहे. 

Kangana Ranaut : स्वत:बद्दल ‘गुगल’वर सर्च केल्यानंतर कंगना रनौत नाराज; म्हणाली,

कंगना लवकरच 'चंद्रमुखी 2' या आगामी सिनेमात दिसणार आहे. 'चंद्रमुखी 2' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री पहिल्यांदाच राघव लॉरेन्स सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. कंगनाच्या शाही अंदाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा 2005 मध्ये आलेल्या पी. वासु दिग्दर्शित सिनेमाचा सीक्वेल आहे. या सिनेमात रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत झळकले होते. आता प्रेक्षकांना 'चंद्रमुखी 2' या सिनेमाचा सीक्वेल आहे. तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

'चंद्रमुखी 2' कधी होणार रिलीज? (Chandramukhi 2 Released Date)

'चंद्रमुखी 2' या थरार नाट्य असलेल्या विनोदी सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. पी. वासु यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कंगना रनौतसह या सिनेमात वडिलेलू, सृष्टी डांगे आणि लक्ष्मी मेनन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget