एक्स्प्लोर

Kangana Ranaut Tweet : 'पठाणची एका दिवसाची कमाई तुझ्या आयुष्यभरातील कमाईपेक्षा जास्त' युजरच्या टीकेला कंगनाचे चोख उत्तर

Kangana Ranaut Tweet : कंगना रणौतने तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीदरम्यान 'पठाण' चित्रपटाचे कौतुक केले. परंतु, एका ट्विटर युजरने तिच्यावर टीका केलीय.

Kangana Ranaut Tweet : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच कंगनाने शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचे कौतुक करत  असे चित्रपट चालले पाहिजेत असे म्हटले आहे. दरम्यान, एका ट्विटर युजरने शाहरुखच्या 'पठाण' या कलेक्शनवर कंगना राणौतला टोमणा मारला आहे. त्या युजरला कंगनाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.   

डॉ. निमो यादव नावाच्या युजरने कंगनाच्या एका पोस्टला उत्तर देताना म्हटले की, 'पठाणची एका दिवसाची कमाई तुमच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे. यावर प्रतिक्रिया देताना कंगना रणौतने म्हटले की, 'निमो भाई, मला माझ्या आर्थिक परिस्थितीची फारशी चिंता नाही.  फक्त एक चित्रपट बनवण्यासाठी मी माझे घर, माझे कार्यालय, सर्व काही गहाण ठेवले आहे. प्रत्येकजण पैसे कमावतो. असा कोण आहे  जो असे पैसे उडवू शकतो. 


 
पठाण चित्रपटाचे कौतुक 

कंगना रणौतने तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीदरम्यान 'पठाण' चित्रपटाचे कौतुक केले. यावेळी तिने शाहरुख खानच्या चित्रपटाची स्तुती करताना बालगीतांचे पठण केले. कंगना म्हणाली, 'पठान चांगली कामगिरी करत आहे. असा चित्रपट चालायला हवा. मला वाटतं की आपली हिंदी सिनेसृष्टी मागे राहिली आह, प्रत्येक व्यक्ती आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहे'.

 यावेळी कंगना राणौतने इमर्जन्सी चित्रपटासाठी तिची मालमत्ता गहाण ठेवल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'मी ठरवेल ते काम करत राहते. माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही. मी एका मिनिटात कोणताही निर्णय घेते. पण ते (मालमत्ता गहाण ठेवणे) माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण शूटिंगच्या वेळी बँकेत चकरा मारणे, त्याकाळात आमचे शूटिंग देखील बंद झाले होते. माझ्यासाठी हे थोडे अवघड होते, पण काहीही धोका पत्करणे हा माझ्यासाठी मोठा निर्णय नव्हता.

 गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्माती आणि दिग्दर्शक देखील आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. इमर्जन्सी हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगममध्ये कंगना रणौत सध्या व्यस्त आहे. 
 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget