एक्स्प्लोर

संविधानाची ताकद दाखवणारा ‘कलम का बादशाह’ येतोय; मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!

सत्तेला प्रश्न विचारणारी आणि सामान्य माणसाच्या हक्कांचा आवाज बनणारी ही कथा लवकरच प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. 

Kalam ka badshah: कायद्याची धार, संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील जिद्द या सगळ्यांचा थरारक संगम म्हणजे व्हि.एम.भैलुमे निर्मित आणि आनंदकुमार सरवदे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट ‘कलम का बादशाह’. सत्तेला प्रश्न विचारणारी आणि सामान्य माणसाच्या हक्कांचा आवाज बनणारी ही कथा लवकरच प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. 

‘कलम का बादशाह’ हा सिनेमा दीक्षा आणि जय या दोन तरुणांच्या संघर्षमय प्रवासाची सशक्त मांडणी करतो. अन्याय, भीती आणि सत्तेच्या दबावासमोर न झुकता ते संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा आधार घेत लढा उभारतात. कायदा हेच त्यांचं शस्त्र ठरतं आणि धैर्य ही त्यांची खरी ताकद. या प्रवासात ते फक्त शत्रूशीच नव्हे, तर समाजातील व्यवस्थात्मक त्रुटींशीही भिडतात, ज्यामुळे हा सिनेमा केवळ थरारक न राहता विचारप्रवर्तक ठरतो.

दमदार कथानक, सामाजिक आशय 

या चित्रपटात मोनालिसा बागल, यश डिंबळे, आनंद शिंदे आणि जय मोर्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२३ मध्ये आलेला सिनेमा ‘रावरंभा’ नंतर काही काळ पडद्यापासून दूर राहिलेली अभिनेत्री मोनालिसा बागल ‘कलम का बादशाह’ या चित्रपटातून सुमारे दोन ते तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनयातली प्रामाणिकता, नजरेतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण ही मोनालिसाची ओळख आहे. सामाजिक आशय असलेल्या आणि वास्तवाशी भिडणाऱ्या भूमिका साकारण्यात ती सातत्याने लक्षवेधी ठरली आहे आणि आता पुन्हा एकदा या सिनेमातून तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. विशेष म्हणजे ‘कलम का बादशाह’ हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे कथा व दिग्दर्शन आनंदकुमार सरवदे यांनी केले असून, निर्माते व्ही. एम. भैलुमे हे आहेत. आर. बी. फिल्म्स प्रॉडक्शन यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सिनेमाचे छायाचित्रण मनीष वि. सोनी यांनी सांभाळले असून, पटकथा व संवाद कल्पेश जगताप यांनी लिहिले आहेत.

एक वेगळा आणि थरारक अनुभव ठरणार

शक्तिशाली विषय, प्रभावी अभिनय आणि संविधानाच्या मूल्यांवर आधारित आशय यामुळे ‘कलम का बादशाह’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि थरारक अनुभव ठरणार आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारायला भाग पाडणारा आणि संविधानाच्या शक्तीची जाणीव करून देणारा सिनेमा ‘कलम का बादशाह’ लवकरच आपल्या जवळच्या सिनेमागृहात.

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget