Jackie Shroff :

  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हा अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखी चर्चेत असतो. बॉलिवूडचा 'भिडू' अशी जॅकी श्रॉफची ओळख आहे. जॅकीचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो एका कुटुंबासोबत बसलेला दिसत आहे. फोटोमधील कुटुंब हे जॅकीच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या दिलीप गायकवाड या कार्मचाऱ्याचं आहे. दिलीपच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच जॅकीनं दिलीपच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. 


दिलीप गायकवाड हा जॅकी श्रॉफच्या पुणे जिल्ह्यातील चांदखेड गावातील फार्महाऊसमध्ये काम करतो. त्याच्या वडिलांचे अल्पशा आजारानं निधन झाले. ही बातमी कळताच जॅकी श्रॉफ हा दिलीपच्या चांदखेड गावातील घरी गेला. जॅकीनं दिलीपच्या कुटुंबाचे सांत्वन केले. जॅकीच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तो दिलीपच्या कुटुंबासोबत बोलताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरल झालेल्या फोटोला कमेंट करत जॅकी श्रॉफचं कौतुक केलं आहे.






जॅकी श्रॉफनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.  'सौदागर', 'राम लखन', 'त्रिदेव', 'परिंदा', 'बॉर्डर', 'रंगीला', 'अग्निसाक्षी', 'खलनायक' आणि 'शपथ' या जॅकी श्रॉफच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जॅकी श्रॉफ त्याच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha