Mika Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh) गाण्यांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. चाहता खन्ना ते अकांक्षा पुरी अनेक मुलींसोबत मिका सिंहचं नाव जोडण्यात आलं. पण त्यानं नेहमी त्याच्या रिलेशनशिपबाबत बोलणं टाळलं. मिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या स्वयंवर होणार असून हे स्वयंवर सर्व प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मिकानं त्याला आलेल्या लग्नाच्या मागण्यांबाबत सांगितलं. 


मुलाखतीमध्ये मिका म्हणाला, 'मला 20 वर्षामध्ये 150 मुलींनी लग्नासाठी प्रपोज केलं. पण कधीच हिंमत नाही झाली की त्या मुलींना घेऊन माझ्या भावाकडे लग्नची बोलणी करण्यासाठी भेटावे. त्यामुळे मी त्या मुलींना लग्न करण्यास नकार दिला. पण आता मी स्वयंवर करणार आहे. '   


'मीका दी वोटी' नावाचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोसाठी मुलींच्या नावाच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशनची शेवटची तारिख आठ मे आहे. शो स्टार भारत हा चॅनल प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 



कसा असेल शो?


टीव्हीवर या प्रकारचे शो नेहमीच सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे हा शो रंजक होणार यात शंकाच नाही. मीडिया रिपोर्टनुसार शोबाबत सर्व नियोजन पूर्ण झाले आहे. हा एक रिअॅलिटी शो असेल, जो एखाद्या स्वयंवरासारखाच असेल. शोच्या स्वरूपाबाबतही संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. या शोमधून मिका केवळ एक साथी निवडेल. यानंतर तो वैयक्तिक आयुष्यात निर्णय घेईल आणि नात्याला पुढे नेईल. मिका सिंह स्वतः या शोमध्ये सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha