TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर पाच बॉलिवूड सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. यात 'आरआरआर', 'द कश्मीर फाइल्स', 'सूर्यवंशी', 'गंगूबाई काठियावाडी' आणि '83' सिनेमाचा समावेश आहे.
आरआरआर (RRR) : एसएस. राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होणार आहे.
द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) : 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. सोशल मीडियावरदेखील हा सिनेमा चर्चेत आहे. तसेच हा सिनेमा अनेक राज्यांत करमुक्तदेखील करण्यात आला आहे. आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 231.28 कोटींची कमाई केली आहे.
सूर्यवंशी (Sooryavanshi) : अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी'सिनेमा 5 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. भारतात हा सिनेमा चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. तसेच जगभरात या सिनेमाने 280 कोटींची कमाई केली आहे.
गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) : 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 25 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
83 : रणवीर सिंहचा '83' सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
संबंधित बातम्या
RRR ते KGF 2; 'या' चित्रपटांच्या ट्रेलरची चाहत्यांमध्ये क्रेझ
RRR Box Office Collection Day 4: ‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा! हिंदी व्हर्जनचाही बॉक्स ऑफिसवर कल्ला!
Oscars 2022 : 'जर माझ्या आई आणि बहिणीची चेष्टा कोणी केली तर...'; कंगनाचा विल स्मिथला पाठिंबा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha