Admission in Architecture : आर्किटेक्चरच्या पदवी शिक्षण प्रवेशासाठी आता गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांची आवश्यकता नसल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) म्हटले आहे. AICTE ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या हँडबुकमध्ये याबाबतची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याशिवाय, फॅशन टेक्नोलॉजी आणि पॅकेजिंग टेक्नोलॉजी या विषयांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य नाहीत.
आर्किटेक्चर पदवी शिक्षणाबाबत AICTE ने घेतलेल्या निर्णयामुळे मोठी चर्चा झडण्याची शक्यता आहे. मागील वर्षी तंत्रशिक्षण प्राधिकरणाने 12वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित (PCM) यांचा अभ्यास न केलेले विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकतात, असा निर्णय जाहीर केला होता.
AICTE च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय घेण्याआधी आम्ही एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांना ऐच्छिक करण्याबाबत या समितीने शिफारस केली. PCM या विषयांशिवाय, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, बायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, अॅग्रीकल्चर, इंजिनियरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना राखीव जागा
आगामी शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निक शैक्षणिक संस्थांमध्ये 'PM CARES' योजनेंतर्गत कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याचा निर्णय AICTE ने जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पीएम केअर्स प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांना या supernumerary कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.
या योजनेनुसार, कोरोना महासाथीच्या आजारात 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे पालक, दत्तक पालकांचे 3 मार्च 2020 नंतर निधन झाले असेल अशा विद्यार्थ्यांना या कोट्यातून प्रवेश मिळू शकेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- उन्हाळी सुट्टी रद्द झाल्याने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये सुरु राहणार, शिक्षण आयुक्तांची माहिती
- Exam 2022 : पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 'या' महिन्यात होणार; परीक्षा परिषदेने घेतला महत्त्वाचा निर्णय
- अल्पसंख्याक समाजासाठी राज्यात वेगळे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालये ; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI