एक्स्प्लोर

आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला 'स्थळ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सचिन पिळगांवकर निभावणार महत्त्वाची भूमिका

Sthal Movie Releaed on 7th March : आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन  प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित 'स्थळ' या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगांवकर करणार आहेत.

Sthal Movie Releaed on 7th March : अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये (Marathi Movie) अभिनय, चित्रपटांचे दिग्दर्शन, गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकिर्द गाजवणारे आणि मराठी चित्रपट सृष्टीत महागुरू म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन  प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित 'स्थळ' या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगांवकर करणार आहेत. महिला दिनाचं औचित्य साधत 7 मार्चला 'स्थळ' (Stahl Marathi Movie) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) यांच्या जयंती निमित्त 'स्थळ' चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी 'स्थळ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांनी शॉर्ट फिल्म्ससह 'गिल्टी माईंड्स' या गाजलेल्या वेब सीरिजचं सहदिग्दर्शन केलं होतं. 'स्थळ' हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि तिथे त्याला सर्वश्रेष्ठ आशिया पॅसिफिक फिल्मसाठी NETPAC अवॉर्डसुद्धा मिळाला. त्यानंतर तब्बल 29 महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे आणि 16 पेक्षा जास्त पुरस्कारही पटकावले आहेत. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

सर्वप्रथम श्रियाने मामी फेस्टिवल मध्ये हा चित्रपट पाहिले होता. खास श्रियाच्या आग्रहास्तव अमेरिकेत 'नाफा' फिल्म फेस्टिवल मध्ये मी आणि सुप्रियाने 'स्थळ' हा चित्रपट पाहिला. त्यावेळीच हा चित्रपट आम्हा दोघांनाही प्रचंड आवडला होता.महाराष्ट्रातील मातीत रूजलेल्या या चित्रपटाला अमेरिकेच्या मराठी लोकांनी डोक्यावर घेतलेले पाहून, चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा असे निर्माता, दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना आम्ही सांगितले. 'स्थळ'  चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मला चित्रपटाची प्रस्तुती करण्यास विचारले आणि मी लगेच होकर दिला.  चांगली संहिता ही रसिक प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहचली पाहिजे यासाठी मी या चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरविले असे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
Embed widget