एक्स्प्लोर

सनी देओल-ऋतिक रोशन यांच्यात कुस्ती? लाहोर-1947 अन् वॉर-2 एकाच दिवशी होणार रिलिज; कोण ठरणार वरचढ?

वॉर-2 आणि लाहोर-1947 हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास ऋतिक रोशन आणि सनी देओल यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे.

War 2 vs Lahore 1947: बॉलिवुडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असतं. या क्षेत्रात प्रत्येकवेळी नवनव्या चित्रपटांविषयी चर्चा केली जाते. हे वर्षदेखील बॉलिवुडसाठी अगदीच खास ठरणार आहे. कारण या वर्षी सलमान खानपासून ते ऋतिक रोशनसारख्या दिग्ज अभिनेत्याचे चित्रपट येणार आहेत. असे असतानाच आता या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रा सनी देओल आणि ऋतिक रोशन यांच्यात कुस्ती होण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झालेच तर या दोन्ही बड्या अभिनेत्यांत स्पर्धा रंगणार आहे. 

दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार?

सनी देओलने गदर-2 या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. सनी देओलचा हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. त्यानंतर आता सनीच्या दुसऱ्या चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. असे असताना याच वर्षी सनी देओलचा  लाहोर-1947 हा बहुप्रतिक्षीत चित्रपट येणार आहे. यासह ऋतिक रोशनचाही वॉर-2 हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही बड्या अभिनेत्यांचे हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाहौर-1947 हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याच दिवशी वॉर-2 हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  

ऋतिक रोशनचा वॉर-2 चित्रपट येणार

वॉर-2 हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचाच एक भाग आहे. या चित्रपटाची कहाणी चांगलीच रंजक असणार आहे. ऋतिक रोशन नुकतेच टायगर-3 या चित्रपटात दिसला होता. त्यामुळे या स्पाय युनिव्हर्समध्ये पाठाण हे पात्र साकारणारा शाहरुख खानही झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वॉर-2 या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरदेखी दिसणार आहे.

सनी देओलसोबत प्रीति झिंटा दिसणार

दुसरीकडे लाहोर-1947 या चित्रपटाचीही चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात सनी देओल हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्यासोबत प्रमुख अभिनेत्री म्हणून प्रीति झिंटा दिसणार आहे. या चित्रपटात अॅक्शन, ड्रामा असं सगळंच दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाला अभिनेता आमीर खान प्रोड्यूस करत आहे. तर राजकु्मार संतोषी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे चित्रिकरणही पूर्ण झाले आहे.  

दरम्यान हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले, तर कोण बाजी मारणार? कोण वरचढ ठरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याआधी हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्री हनी रोजचा बड्या उद्योगपतीवर लैंगिक छळाचा आरोप, पोलिसांनीही 'त्याला' ठोकल्या बेड्या

Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडेचं मराठमोळं फोटोशूट; पाहा खास फोटो!

करोडो रुपयांचा सेट, कोट्यवधींचं रक्तचंदन, पुष्पा-2 सिनेमा कसा तयार झाला? मेकिंगचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Embed widget