Hrishikesh Joshi On Pune Sanyasta Khadag Theatre Play: पुण्यात 'संन्यस्त खडग' नाटकादरम्यान राडा, गौतम बुद्धांच्या बाबतीत 'चुकीचा वाक्यप्रयोग' केल्याचा वंचितचा आरोप, अभिनेते ऋशिकेश जोशी म्हणाले...
Hrishikesh Joshi On Pune Sanyasta Khadag Theatre Play:

Hrishikesh Joshi On Pune Sanyasta Khadag Theatre Play: सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक संगीत 'संन्यस्त खडग' (Sanyasta Khadag) यांच्या 12 जुलै शनिवारच्या प्रयोगावेळी (Marathi Play) प्रचंड गोंधळ झाला. सात्यिकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी आयोजित केलेल्या या प्रयोगाला शेकडो प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. पण, नाटक सुरू असतानाच संध्याकाळी साडेसहा वाजता नाटकाला सुरुवात झाली, पण रात्री साडेआठच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात गोंधळ (Chaos In The Theater) घालायला सुरुवात केली, पण पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि नाट्यगृहातून बाहेर घेऊन गेले. प्रयोग सुरू असचानाच असं काहीतरी घडल्यामुळे नाट्यगृहात काही काळासाठी तणावाचं वातावरण होतं.
वंचितनं (Vanchit Bahujan Aghadi) नाटकाच्या प्रयोगापूर्वीच हे नाटक पुण्यात होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. तरीसुद्धा प्रयोगाचं आयोजन केल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात धाव घेतली. नाटकामध्ये गौतम बुद्धांच्या बाबतीत 'चुकीचा वाक्यप्रयोग' केल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी आरोप केलेला की, "आम्ही हे नाटक पूर्णपणे पाहिलं आहे. नाटकात खोटी माहिती दाखवली आहे. आम्ही हे नाटक चालू देणार नाही. आयोजकांवर कारवाई झाली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चुकीचं लिहिलं आहे."
दरम्यान, गोंधळ झाल्यानंतर काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली, पण पोलिसांनी मध्यस्थी केली आणि काही काळानं तणाव निवळला... पण, यामुळे प्रेक्षकांना मोठा मनस्थाप सहन करावा लागला.
अभिनेते ऋषिकेश जोशी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणाले?
काल संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग पुण्यात यशवंत नाट्यगृहात साजरा झाला. प्रयोगादरम्यान काही आंदोलकांनी प्रयोग संपत आला असताना अचानक घोषणा बाजी सुरू केली. त्यांनी त्यांची घोषणा
काल संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग पुण्यात यशवंत नाट्यगृहात साजरा झाला. प्रयोगादरम्यान काही आंदोलकांनी प्रयोग संपत आला असताना अचानक घोषणा बाजी सुरू केली. त्यांनी त्यांची घोषणाबाजी केली, त्यांना पोलिसांनी थांबवलं आणि ते त्यांना बाहेर घेऊन गेले. वास्तवात घडलेला घटनाक्रम असा
— Hrishikesh joshi (@rishijo) July 13, 2025
बाजी केली, त्यांना पोलिसांनी थांबवलं आणि ते त्यांना बाहेर घेऊन गेले. वास्तवात घडलेला घटनाक्रम असा होता की, जे कुणी आंदोलक आले होते, ते नाटक पाहायला शेवटपर्यंत बसले होते. अडीच तसाच्या नाटकात शेवटचा प्रसंग सुरू झाला… शेवटचा म्हणजे किती, की अगदी सामान्य प्रेक्षकालाही लक्षात येत होतं की, पुढच्या एखाद मिनिटात नाटक संपणार आहे. विक्रमसिंह या पात्राच्या तोंडी जी दोन वाक्ये होती
त्यातलं पहिलं वाक्य झालं आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.. त्याचवेळी हे आंदोलक घोषणा देत रंगमंचाकडे आले, स्टेजवर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.. पोलिसांनी त्यांना अडवलं. मंचावर सर्वच पात्रे होती. आंदोलकांच्या घोषणा होईपर्यंत कलाकार आणि तंत्रज्ञ शांतपणे उभे राहिले. प्रयोगाला खासदार मेधाताई कुलकर्णी पहिल्या रांगेत नाटक बघायला बसल्या होत्या. त्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. घोषणा देणारे बाहेर गेले. प्रेक्षकांनी आवाज दिला. सुरू करा नाटक. दिग्दर्शक या नात्याने मी पुढे होऊन प्रयोग सुरू केला.
गौतम बुद्धांचा अनुयायी असलेल्या, बुद्धांच्याच सांगण्यावरून संन्यास घेतलेल्या विक्रमसिंहाचं पुढचं एकंच वाक्य उरलं होतं.. ते असं की, "मला क्षमा करा भगवन..." तोवर नाट्यगृहाबाहेर अधिक संख्येच्या लोकांची घोषणाबाजी आत ऐकू येत होती. नाटक पुन्हा सुरू होऊन, जे उरलेच काही सेकंदांचे होते ते पार पडले. प्रथेप्रमाणे कलाकारांची ओळख झाली. बाहेरचा गोंधळ थांबे पर्यंत प्रेक्षकांना आतच बसा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. प्रेक्षकांनी नुसतच बसण्यापेक्षा सुलोचना या पात्राच्या तोंडी असलेल्या गाण्याची फर्माइश दिली. जे गाणे नाटकात सादर केले जात नाही, ते केतकी चैतन्य हिने अप्रतिम सादर केले.
त्या गाण्याचे बोल असे आहेत की,
सुकताचि जगी या, जरी की,
फुले गळत पाकळी पाकळी
उमलती ना त्याही कलिका,
ज्या...
परंतू सुंदर पाकळ्या पाकळ्या
फुलती ही जगी या..
विसर ना हे वैतागी तुझिया
नाटक पार पडले, प्रेक्षक कलाकारांना भेटायला आत आले.
पण खरे राहून राहून आश्चर्य...
या गोष्टीचे अधिक वाटले की, नाटक संपून मिनिट दोन मिनिट होत नाहीत तोवर, पुण्यात संन्यस्त खड्ग नाटक बंद ‘पाडले’ अशा ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. हे नाटक ‘सावरकरांच्या जीवनावर आधारित’ असल्याचा बातमीतला पहिलाच उल्लेख ऐकून समस्त कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही प्रचंड धक्का बसला.
न्यूज चॅनेलची निवेदिका, इतक्या 'तातडीने घटनास्थळी' उपस्थित असलेल्या वार्ताहराला विचारत होती की, "तिथली नक्की परिस्थिती काय आहे? दोन बाजूने घोषणाबाजी नक्की कोणत्या कारणावरून होत आहे?" त्यावर त्या घटनास्थळी वार्ताहराने उत्तर दिले की, "का घोषणा दिल्या जातायत त्या बद्दल मला नक्की माहीत नाही." हा नाट्यप्रयोग, ज्याला सातत्याने 'कार्यक्रम' संबोधलं गेलं, हा सात्यकी सावरकरांनी आयोजित केला होता असा किमान 5 वेळा उल्लेख बातम्यांमध्ये येत होता. ते प्रयोगाला उपस्थित आहेत असंही वार्ताहर बोलला. मुळात एरव्ही व्यावसायिक नाटक जसे नाट्यगृहात तारीख घेऊन लावले जाते...
तसे या नाटकाचा प्रयोग नाट्यनिर्मात्यांनी लावला होता. त्याचा सात्यकी सावरकरांशी काहीही संबंध नव्हता. ते प्रयोगाला उपस्थितही नव्हते. “नाटक किती वेळानंतर बंद पाडण्यात आले?” या प्रश्नावर वार्ताहर म्हणाला की, “अर्ध्या तासानंतर ते बंद पाडण्यात आले.” वृत्त वाहिन्यांनी उपस्थित असलेल्या निर्माता, दिग्दर्शक, मॅनेजर, कलाकार यांच्या पैकी कुणालाही फोन केला असता, तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. आणि समजले असते की, नाटक चुकूनही बंद पाडण्यात आले नाही. ते व्यवस्थित उपस्थित प्रेक्षकांसमोर पार पडले.
‘उपस्थित असलेल्या वार्ताहराने’ ज्या बाबी सांगितल्या त्या सगळ्या सपशेल खोट्या होत्या हे इथे सखेद नमूद करावे लागेल....























