एक्स्प्लोर

बॉक्स ऑफिसवर जेमतेम, ऑस्करच्या शर्यतीत अपयशी.. लेखकानं खर्चाचा विषय काढत करण जोहरला म्हटलं ..

हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या विभागात नामांकनासाठी पाठवण्यात आला होता, मात्र टॉप-5 मध्ये प्रवेश करू शकला नाही.

Homebound Oscar Exit: नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ या चित्रपटाला ऑस्कर 2026च्या नामांकनात अंतिम यादीत स्थान मिळवता आलं नाही. हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या विभागात नामांकनासाठी पाठवण्यात आला होता, मात्र टॉप-5 मध्ये प्रवेश करू शकला नाही. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे लेखक सुमित रॉय यांनी ऑस्कर मोहिमेतील अडचणी आणि खर्चांबाबत भाष्य करत करण जोहर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

कधी-कधी या मोहिमेचा खर्च चित्रपटाच्या बजेटपेक्षाही जास्त

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सुमित रॉय म्हणाले की, ऑस्करसाठी प्रमोशन करणं अत्यंत कठीण, गुंतागुंतीचं आणि खर्चिक असतं. “कधी-कधी या मोहिमेचा खर्च चित्रपटाच्या बजेटपेक्षाही जास्त होतो. बहुतांश भारतीय चित्रपटांसाठी हा प्रवास नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. मात्र, करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शन्स यांनी खूपच उत्तम काम केलं. आम्हाला सर्वोत्तम संधी मिळावी यासाठी त्यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. यापेक्षा अधिक आम्ही काही करू शकलो नसतो,” असं सुमित रॉय यांनी सांगितलं.

अकॅडमीच्या वॉटर्सचं लक्ष वेधणं हे मोठं आव्हान

लेखक सुमित रॉय पुढे म्हणाले की, इंटरनॅशनल कॅटेगरीमध्ये जगभरातील जवळपास 90 सर्वोत्तम चित्रपटांशी स्पर्धा असते.“सर्वात मोठं आव्हान म्हणजे अकॅडमीच्या मतदारांचं लक्ष वेधून त्यांना मतदानापूर्वी आपला चित्रपट पाहण्यासाठी प्रवृत्त करणं. यासाठी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर करणं महत्त्वाचं ठरतं. यामुळे चित्रपटाबाबत चर्चा आणि उत्सुकता निर्माण होते आणि वोटर आपला वेळ देऊन चित्रपट पाहतात,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चांगल्या कथांना पाठिंबा देणाऱ्या निर्मात्यांची गरज

भारतीय चित्रपटसृष्टीबाबत बोलताना सुमित रॉय म्हणाले,“आपल्याकडे जगातील सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रींपैकी एक आहे. भारत हा कथांचा महासागर आहे आणि आपल्या देशात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञ आणि फिल्ममेकर आहेत. ऑस्कर आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील नामांकनामुळे आपल्या सिनेमाला जागतिक स्तरावर ओळख मिळते. आपल्याला अशा निर्मात्यांची आणि कलाकारांची गरज आहे, जे चांगल्या कथा आणि चांगल्या दिग्दर्शकांना पाठिंबा देतील. धाडसी आणि स्वतंत्र चित्रपटांना साथ देणारे अधिक निर्माते पुढे आले, तर आंतरराष्ट्रीय ओळख आपोआप मिळेल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

‘होमबाउंड’ला समीक्षकांची प्रशंसा

नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत दिसले होते. चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपट विशेष यश मिळवू शकला नाही. दरम्यान, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर ‘होमबाउंड’चं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं आणि सर्व स्तरातील प्रेक्षकांनी चित्रपटाला पसंती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget