एक्स्प्लोर

आमच्यात 4 महिने बोलणं बंद, अचानक मेसेज आला अन्... रांगड्या 'राणा दा'ची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी कशी? म्हणाला , अक्षया..

पण अक्षया आपल्या आयुष्यात यायला पाहिजे हे कधी वाटलं? कशी होती राणादा आणि अंजलीची खरा आयुष्यातील लव स्टोरी? हे अभिनेता हार्दिक जोशीने एका मुलाखतीत सांगितला आहे. 

Hardik Joshi: मराठी मालिका विश्वात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. पण काही भूमिका या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणाऱ्या असतात. याच भूमिकांमधील आजही लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी याची. त्याच्या करिअर मधला हा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता. या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आजही तो राणादा म्हणूनच ओळखला जातो. विशेष म्हणजे या मालिकेतील अंजली बाई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षय देवधर हिच्याशी खऱ्या आयुष्यातही हार्दिकने लग्न केल्याने या दोघांच्या वैयक्तिक आयुष्य विषयीही प्रेक्षकांना कायम कुतूहल असते. दोघांच्याही वेगवेगळ्या जीवनशैली, जडणघडण होती.. पण अक्षया आपल्या आयुष्यात यायला पाहिजे हे कधी वाटलं? कशी होती राणादा आणि अंजलीची खरा आयुष्यातील लव स्टोरी? हे अभिनेता हार्दिक जोशीने एका मुलाखतीत सांगितला आहे. 

हार्दिकच्या आधी त्याच्या आईनेच घातली अक्षयला मागणी

मित्र म्हणे या podcast मध्ये हार्दिक म्हणाला' मी कधीच असा विशिष्ट विचार केला नव्हता. कारण माझ्याबद्दल तिला सगळंच माहिती होतं. माझ्या आयुष्यातलं बरंच तिला माहीत होतं. हे माहीत असण्याचं कारणही तुझ्यात जीव रंगला ही मालिकाच होती. जेव्हा आपण एकत्र मालिका करतो तेव्हा प्रत्येकाच्या फॅमिलीबद्दल, आयुष्याबद्दल गोष्टी माहित होतात. मालिकेपूर्वी आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो. मालिका सुरू झाली तेव्हा हे दुसऱ्या शेड्युलला अक्षया यायची.  नंतर आमची ओळख झाली. मालिकेच्या शूटिंगसाठी आम्ही तिकडेच असायचं. त्यामुळे आई वडील यायचे, भेटायचे.. नंतर 2018 मध्ये माझ्या आईने अक्षयला विचारलं की माझ्या मुलाशी लग्न करशील का? आणि तिने हे अक्षयला विचारलं हे मला कळलं सहा सात महिन्यांनी. आणि आईची इच्छा होती की जर तुला सून म्हणून आणायचे असेल तर अक्षयाशी तुला बोललं पाहिजे. नंतर आई माझी मागेच लागायला लागली. यावर अक्षयाच म्हणणं होतं की आधी तुमच्या मुलाशी बोलून बघा."

कुणालाही वाटेल बायको हवी तर अक्षयासारखी...

"मालिकेत असताना मैत्री पलीकडे आमच्यात काहीही नातं नव्हतं. एक चांगली मैत्रीण अशीच माझ्या मनात तिची प्रतिमा होती. अक्षय अशी मुलगी आहे की तिला बघून कोणालाही वाटेल की बायको असावी तर अक्षयासारखी. कारण ती घराला प्राधान्य देते. समोरच्याला आदर देते. समोरच्याच्या प्रोफेशनचा रिस्पेक्ट करते. आणि आम्ही एकाच क्षेत्रात आहोत त्यामुळे तिला माझं काम माहिती मला तिचं माहिती. आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो याबाबतीत. नंतर मग मी एक दिवस ठरवलं की आई एवढं बोलते तर आता जातोच. " असं हार्दिक म्हणाला 

आमच्यात चार महिने बोलणं बंद होतं 

आईने तिला लग्नाबद्दल विचारल्यानंतर आमच्यात बोलणं बंद झालं होतं.  मालिका झाल्यानंतर 2022 मध्ये मी तिला लग्नासाठी विचारलं. मी आधी लग्नाचा विषयच सोडला होता. मी  व्हिसाच्या कामासाठी घरी गेलो होतो. आज जर बोलला नाहीस तर बघ असं मला बजावण्यात आलं. भाऊ खाली उभारला होता. मग मी अक्षयाच्या घरी गेलो. तिच्या वडिलांना म्हणालो की मी किती फटका आहे हे तुमच्या मुलीला माहित आहे. मी माणूस म्हणून कसा आहे हेही तिला माहित आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता हे माहिती होतं. चार महिन्यानंतर मला रिप्लाय आला. मला अक्षयाच्या आईचा फोन आला. ती म्हणाली मेसेज वाचलास का? मला वाटलं गुड मॉर्निंगचे फोटो असतील. थांबा बघतो म्हणून मी पाहिलं .  असही तो म्हणाला.

थेट लग्नाच्या तारखा समोर....

मी शूटसाठी रस्त्यावरून चालत जात होतो. मेसेज बघून  जिथल्या तिथे थांबलो. माझ्यासमोर लग्नाच्या तारखा होत्या. 22 एप्रिलला मला फोन आला. लवकरात लवकर भेटायचं आहे या तारखेला. 27 एप्रिलला मी भेटलो. आणि अक्षय म्हणाली की मला तीन महिलाच साखरपुडा करायचा आहे. तुला काय करायचं आहे ते तू कर. माझा शूटिंगचा पहिला दिवस होता. त्यामुळे मी म्हणालो की पहिलाच दिवशी असं कसं सांगणार की माझं साखरपुडा आहे आणि मला सुट्टी हवी आहे. अक्षयाच ठरलं होतं की अक्षय तृतीया आहे माझा वाढदिवस असतो त्याच दिवशी मला साखरपुडा करायचा आहे. मी तयार झालो. दादा आणि वहिनीने सगळं मॅनेज केलं होतं. ठाण्यात आमच्या साखरपुडा झाला. असं हार्दिकने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget