Swara Bhasker Birthday : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) 9 एप्रिल रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. स्वरा अशा बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जी आपल्या बेधडक शैलीसाठी देखील ओळखली जाते. स्वराने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले, जे संस्मरणीय ठरले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, स्वरा OTT प्लॅटफॉर्मवर देखील सक्रिय आहे आणि वेब सीरीज विश्वाचा देखील एक भाग बनली आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त स्वरा भास्कर राजकारणापासून ते समाजातील चढ-उतारांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर बेधडक बोलण्यासाठी ओळखली जाते. स्वरा एक अशी अभिनेत्री आहे, जिची वक्तव्ये तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत असतात. चला जाणून घेऊया स्वराला ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ ठरवणारी तिची वक्तव्ये...
‘द कश्मीर फाइल्स’वर टीका
विवेक अग्निहोत्रींचा 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट सर्वांनाच आवडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. मात्र, स्वरा भास्करने या चित्रपटावर टीका केली आहे. एका ट्विटमध्ये स्वराने विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला होता. तिने लिहिले होते की, 'जर तुम्हाला तुमच्या मेहनतीबद्दल लोकांनी तुमचे अभिनंदन करावे असे वाटत असेल, तर पहिल्या 5 वर्षांत त्यांच्या डोक्यावर घाण पसरवू नका.' या ट्विटनंतर स्वरा भास्कर खूप ट्रोल झाली होती.
हिजाब वादावर स्वरा भास्करचे वक्तव्य
स्वरा भास्करने हिजाब वादावर आपली वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती, त्यात तिने द्रौपदी आणि महाभारताचा मुद्दा उपस्थित केला होता. अभिनेत्रीने हिजाब वादाची तुलना द्वापर युगातील द्रौपदी चीरहरणाशी केली होती. स्वरा भास्करने ट्विट केले होते की, 'महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले आणि सभेत बसलेले जबाबदार, ताकदवान, कायदा करणारे लोक बघत राहिले… आज अशीच आठवण झाली.' या ट्विटनंतर स्वरा भास्करला खूप बोल ऐकावे लागले होते.
पाकिस्तानसंदर्भात वक्तव्य
स्वरा भास्करने पाकिस्तानविरोधातही जोरदार वक्तव्य केले होते. एका वेब सिरीजमध्ये अभिनेत्रीने पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. पण, त्याचवेळी स्वराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, जो 2015चा होता. या व्हिडीओमध्ये स्वरा पाकिस्तानचे जोरदार कौतुक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका पाकिस्तानी शोचा होता, ज्यामध्ये अभिनेत्रीने पाकिस्तानला जगातील सर्वात सुंदर देश म्हणून वर्णन केले होते. या दोन्ही क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.
हेही वाचा :