Will Smith Banned: हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) आता पुढील 10 वर्षे ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीय. ऑस्कर 2022च्या सोहळ्यामध्ये (Oscars 2022) अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता ख्रिस रॉकला (Chris Rock) ‘थप्पड’ मारल्याप्रकरणी विलवर ही बंदी घालण्यात आली आहे. हॉलिवूड फिल्म अकादमीने शुक्रवारी या संदर्भात बोलताना सांगितले की, ‘ऑस्करच्या मंचावर सूत्रसंचालक ख्रिस रॉकला थप्पड मारल्यानंतर त्यांच्या बोर्ड ऑफ गव्हर्नरने विल स्मिथला ऑस्करसह त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांवर उपस्थित राहण्यावर 10 वर्षांसाठी बंदी घातली आहे.’


अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन आणि मुख्य कार्यकारी डॅन हडसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘94वा ऑस्कर सोहळा अनेकांसाठी खूप महत्त्वाचा होता. पण विल स्मिथच्या अस्वीकार्य वागण्याने त्यातील आनंदाचे क्षण धुळीस मिळाले.’ उल्लेखनीय आहे की, या घटनेनंतर विल स्मिथने ख्रिस रॅकची माफी मागून 1 एप्रिल रोजी अकादमीचा राजीनामा दिला होता.


विलने ख्रिस रॉकला मारली थप्पड!


अभिनेता विल स्मिथने ऑस्कर 2022च्या मंचावर कॉमेडियन ख्रिस रॉकला जोरदार थप्पड मारली. ख्रिसने स्मिथची पत्नी जाडा पिंकेट-स्मिथच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली होती. ख्रिसने गमतीने जाडाच्या टक्कल पडण्याचा संबंध एका हॉलिवूड चित्रपटाशी जोडला. जाडा आणि विल स्मिथला ही गोष्ट आवडली नाही. अशा स्थितीत विल स्मिथने शोच्या मध्यातच स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकला थप्पड लगावली.


विल स्मिथचा चित्रपटही थांबला!


इतकंच नाही, तर विल स्मिथचा पुढचा चित्रपट ‘फास्ट अँड लूज’च्या चर्चाही आता पूर्णपणे थांबल्या आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सचा आहे. नेटफ्लिक्सने विल स्मिथच्या ‘फास्ट अँड लूज’ या चित्रपटाचे काम थांबवल्याचे वृत्त देखील समोर आल आहे. ख्रिस रॉकला लगावलेल्या थप्पडचा मोठा फटका विल स्मिथला बसला आहे.


हेही वाचा :