Shahrukh Khan :  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) नुकतेच त्याने आगामी 'पठाण' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. अशातच शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाहरुख नव्या लूकमध्ये दिसत आहे. 


'पठाण' सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर शाहरुखने आता अॅटलीच्या (Atlee) शूटिंगला सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचे नाव 'लायन' असल्याचे म्हटले जात आहे. सध्या शाहरुख मुंबईत या सिनेमाचे शूटिंग करत आहे.





2018 साली प्रदर्शित झालेल्या 'झिरो' सिनेमात शाहरुख शेवटचा दिसला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. शाहरुखला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान जूनमध्ये 'टायगर 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. 





रिपोर्टनुसार, 'पठाण' या सिनेमासाठी शाहरूखनं 85 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. या सिनेमात शाहरूखसोबतच दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील दिसणार आहे. तसेच अभिनेता सलमान खान हा देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 25 जानेवारी 2023 रोजी पठाण हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


संबंधित बातम्या


Sher Shivraj : सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'शेर शिवराज'ची टीम पोहोचली प्रतापगडावर


KGF 2 : 'केजीएफ 2'च्या प्री-बुकिंगला सुरुवात, 12 तासांत पाच हजार तिकिटांची विक्री


Alia-Ranbir Wedding : आलिया भट्ट बनणार रणबीर कपूरची ‘नवरी’! ‘हा’ प्रसिद्ध डिझायनर बनवणार लग्नाचा पेहराव!