Me Vasantrao : 'मी वसंतराव' (Me Vasantrao) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. निपुण धर्माधिकारीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  सिनेसृष्टीतील कलाकार, समीक्षक 'मी वसंतराव' सिनेमाचे भरभरून कौतुक करत आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत या सिनेमात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहेत. 


'मी वसंतराव' सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक या सिनेमाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत. संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, ''हा चित्रपट माझ्या जवळच्या लोकांनी बनवला आहे. मला अभिमान वाटतो की, मराठी सिनेसृष्टीत असा संगीतमय चित्रपट बनला.'' आपली संस्कृती किती श्रीमंत आहे, हे या चित्रपटातून दिसते. मात्र हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन अभिनेता मकरंद देशपांडे यांनी केले आहे. जिओ स्टुडिओजने 'मी वसंतराव'च्या निमिताने नवी सुरुवात केली आहे. हा चित्रपट पाहताना कुठेही यात राहुल आहे, असे वाटत नाही. वसंतरावच आहेत असा भास होतो. अशा शब्दांत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाची स्तुती केली आहे. या चित्रपटाला अश्विनी भावे, रेणुका शहाणे, अंकुश चौधरी, गितांजली कुलकर्णी, आदित्य सरपोतदार, स्वप्नील बांदोडकर, रवी जाधव, वैदेही परशुरामी आदी कलाकारांनीही चित्रपटाबद्दल सकारत्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.





समीक्षकांनीही 'मी वसंतराव'ला पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावरही या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्लाझा सारखे सर्वसामान्यांसाठी असलेले चित्रपटगृह असो वा पॅलेडिअमसारखे उच्चभ्रू वर्गासाठी ओळखले जाणारे थिएटर असो, अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक सिनेमा संपल्यावर शेवटच्या नावापर्यंत थांबून टाळ्यांच्या कडकडाटात पसंती दर्शवत आहेत. सिनेमात वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्या नातवाने म्हणजेच राहुल देशपांडेने साकारली आहे.


संबंधित बातम्या


Albatya Galbatya : किती गं बाई मी हुशार... बच्चेकंपनीला पाहता येणार खट्याळ चेटकिणीची धमाल गोष्ट


Shahrukh Khan : शाहरुखचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल, 'पठाण'नंतर अॅटली दिग्दर्शित सिनेमाचे शूटिंग सुरू


Sher Shivraj : सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'शेर शिवराज'ची टीम पोहोचली प्रतापगडावर