Important days in 9th April : एप्रिल महिना सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 9 एप्रिलचे दिनविशेष. 


इ.स. पूर्व 585: जपानचा पहिला सम्राट सम्राट जिम्मू यांचे निधन


सम्राट जिम्मू हे जपानचे पहिले पौराणिक सम्राट होते. सम्राट जिम्मू यांचा जन्म इ.स.पू. 13 फेब्रुवारी 711 मध्ये झाला होता. तर इ.स.पू. 9 एप्रिल 585 मध्ये त्यांचे निधन झाले. 


1669 : मुघल सम्राट औरंगजेबाने सर्व हिंदू शाळा आणि मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला.


1695 : पंडितकवी वामनपंडित यांनी भोगावमध्ये घेतली समाधी


 प्राचीन मराठी पंडिती काव्याचे एक प्रमुख प्रतिनिधी वामनपंडित होते. वामनपंडितांचा विख्यात ग्रंथ म्हणजे यथार्थदीपिका. वामनपंडितांनी रचिलेल्या तत्त्वचिंतनपर ग्रंथांत निगमसार हा विशेष उल्लेखनीय होय. 


1828 : समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म


महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते अशी गणेश वासुदेव जोशी यांची ओळख आहे. त्यांचे पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी पण सार्वजनिक काका या नावाने ते ओळखले जातात. जातिभेदाच्या अनिष्ट प्रथेला सार्वजनिक काकांचा विरोध होता. 


1860 : मानवी आवाज प्रथमच रेकॉर्ड झाला.


1893 : बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म 


राहुल सांकृत्यायन हे जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित व लेखक होते. बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी ते संस्कृतचे अध्यापक म्हणून श्रीलंकेत गेले होते. साम्यवाद व बौद्ध धर्म−तत्त्वज्ञान या दोहोंच्या समन्वयाने त्यांचे विचार समतोल झाले. 


1948 : सिने-अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म


अभिनेत्री आणि खासदार अशी ओळख असलेल्या जया बच्चन या बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. जया भादुरी हिंदी सिनेसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. जया भादुरी यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 


1965 : कच्छच्या रणात भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले.


1967 : बोइंग-767 या विमानाने केले पहिले उड्डाण 


बोईंग 767 हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. 1967 साली या विमानाने पहिले उड्डाण केले. विमानवाहतूक कंपनीच्या मानाने बोईंग 767 या विमानांची वाहतूक जास्त होते.


1987 : राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते विष्णू गंगाधर ऊर्फ दादासाहेब केतकर यांचा जन्म


राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते विष्णू गंगाधर ऊर्फ दादासाहेब केतकर यांचा जन्म मुंबईमधील फणसवाडी चाळीत झाला. दादासाहेब केतकर हे पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापकदेखील होते.


1988 : अमेरिकेने पनामावर आर्थिक निर्बंध लादले.


1994 : पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान


सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना 1994 साली आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.  पी.एम. भार्गव हे भारतातील पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे (सीसीएमबी) संस्थापक संचालक होते. 


1994 : चंद्र राजेश्वर राव यांचे निधन


 स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे 1994 साली निधन झाले.


1995 : लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं नाव भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून मोठ्या प्रमाणावर गणले जाते. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.  1995 साली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आला. 


1998 : डॉ. विष्णू भिकाजी वि. भि. कोलते यांचे निधन


डॉ. विष्णु भिकाजी कोलते हे मराठी लेखक, महानुभाव साहित्याचे संशोधक व कवी होते. त्यांना इ.स. 1991 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. नागपूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू होण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. 


2001 : अमेरिकन एअरलाइन्सने औपचारिकपणे ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे अधिग्रहण केले आणि त्या वेळी जगातील सर्वात मोठी एअरलाइन बनली.


2001 : शंकरराव खरात यांचे निधन


शंकरराव खरात हे लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. आंबेडकरी चळवळीतील ते एक प्रमुख लेखक होते. दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. शंकरराव खरातांची 'माणुसकीची हाक' ही कादंबरी प्रचंड गाजली. 


2002 : बहरीनमध्ये महिलांना नगरपालिका निवडणुकीत भाग घेण्याची परवानगी मिळाली.


2003 : सद्दामच्या हुकूमशाहीतून इराकला स्वातंत्र्य मिळाले.


2005 : प्रिन्स चार्ल्सने कॅमिलाशी लग्न केले.


2009 : गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन


लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशी अशोक परांजपे यांची ओळख होती. ते महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते. अशोक परांजपे यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाई, लावणी, गवळण, नाट्यगीत अशा अनेक प्रकारांत गाणी लिहिली आहेत. 


2009 : निर्माते शक्ती सामंत यांचे निधन


हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक अशी शक्ती सामंत यांची ओळख होती. 1948  मध्ये सामंत यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सामंतांनी एकूण 43 चित्रपट दिग्दर्शित केले.


2010 : श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्सने 225 जागांच्या संसदेत 117 जागा जिंकल्या.


2011 : सरकारने लोकपाल कायदा लागू करण्याची मागणी मान्य केल्यानंतर अण्णा हजारे यांनी 95 तासांचे आमरण उपोषण संपवले.


2020 : देशात कोरोना व्हायरसमुळे 169 लोकांचा मृत्यू झाला असून, बाधितांची संख्या 5,865 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत संसर्गाची 591 प्रकरणे समोर आली असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha