एक्स्प्लोर

Happy Birthday Rashmi Desai : ‘रावण’मधून केली करिअरची सुरुवात, ‘बिग बॉस’ने मिळवून दिली खरी ओळख, जाणून घ्या रश्मी देसाईबद्दलच्या खास गोष्टी...

Rashmi Desai Birthday : रश्मीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात एका आसामी सिनेमातून केली होती. मात्र, या चित्रपटात अतिशय लहान पात्र असल्यामुळे रश्मी लोकांच्या नजरेतही येऊ शकली नाही.

Rashmi Desai Birthday : अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट असलेली रश्मी देसाई आज (13 फेब्रुवारी) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘बिग बॉस’च्या सीझन 13मध्ये रश्मी देसाईने तिच्या बेधडक स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली होती.

रश्मीचा जन्म 13 फेब्रुवारी 1986 रोजी आसाममध्ये झाला. रश्मीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात एका आसामी सिनेमातून केली होती. मात्र, या चित्रपटात अतिशय लहान पात्र असल्यामुळे रश्मी लोकांच्या नजरेतही येऊ शकली नाही. रश्मीने छोट्या पडद्यापासून भोजपुरी सिनेमापर्यंत आपल्या अभिनयाचा जलवा बिखेरला आहे. केवळ भोजपुरी आणि आसामीच नाही, तर रश्मीने गुजराती आणि मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे.

‘रावण’मधून करिअरची सुरुवात

रश्मीने 2006 मध्ये झी टीव्हीच्या 'रावण' या मालिकेमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. कलर्सच्या 'उतरन' शोमधून रश्मीला छोट्या पडद्यावर मोठी ओळख मिळाली. या टीव्ही शोमुळे रश्मीला घरोघरी ओळख मिळाली होती. ‘उतरन’मुळे रश्मी 'तपस्या' म्हणून प्रसिद्ध झाली. रश्मीने 'दिल से दिल तक', 'इश्क का रंग सफेद', 'अधुरी कहानी हमारी', 'नच बलिए 7' आणि 'खतरों के खिलाडी 6' सारख्या शोमध्ये देखील काम केले आहे.

‘बिग बॉस’मधून मिळाली ओळख

रश्मीच्या करिअरचा आलेख उंचावण्याचे काम ‘बिग बॉस’ने केले. या शोमध्ये आल्यानंतर रश्मीची एक नवीन शैली प्रेक्षकांसमोर आली, जी चाहत्यांना खूप आवडली. शोमध्ये रश्मी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. वास्तविक, रश्मीने तिचा को-स्टार नंदिश संधूसोबत लग्न केले, पण हे नाते फार काळ टिकले नाही. लग्नानंतर काही काळातच दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर रश्मीच्या आयुष्यात अरहान खान आला, पण अरहान खानने बिग बॉसमध्ये असे काही खुलासे केले, ज्यामुळे रश्मी आणि अरहानचे नातेही संपुष्टात आले.

सिद्धार्थसोबतचा वाद चर्चेत!

‘बिग बॉस’मध्ये सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्यामुळे देखील रश्मी देसाईही चर्चेत होती. या शोमध्ये दोघांमध्ये खूप भांडण झाले होते. रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला 'दिल से दिल तक' या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिकेत होते. सुरुवातीला दोघांमध्ये चांगले संबंध होते, पण हळूहळू त्यांच्यात भांडण सुरू झाले. त्याचवेळी हे प्रकरण इतके वाढले की, दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले. त्याचा परिणाम त्यांच्या पडद्यावरच्या केमिस्ट्रीमध्येही दिसू लागला होता. त्यामुळे शोच्या निर्मात्यांनी सिद्धार्थच्या रिप्लेस करण्याचा देखील विचार केला होता.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget