एक्स्प्लोर

Girija Oak Narrates Insolence Local Train: 'त्यानं त्याचं बोट माझ्या मानेपासून, पाठीपर्यंत नेलं अन्...'; गिरीजा ओकनं सांगितला तिच्यासोबत घडलेला 'तो' धक्कादायक प्रसंग

Girija Oak Narrates Insolence Local Train: गिरीजा ओकचा साधेपणा आणि सौंदर्यानं प्रभावित होऊन चाहते तिला 'नॅशनल क्रश' म्हणू लागले. ज्या मुलाखतीमुळे गिरीजा व्हायरल झाली. 

Girija Oak Narrates Insolence Local Train: मराठी इंडस्ट्रीत (Marathi Industry) कित्येक वर्ष काम करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीनं (Marathi Actress) एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि सर्वांचीच मनं जिंकली. बघता बघता ही अभिनेत्री थेट नॅशनल क्रश (National Crush) बनली. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, ती दुसरी-तिसरी कुणी नसून मराठी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak).  'तारे जमीन पर', 'शोर इन द सिटी' आणि 'जवान' यांसारख्या फिल्म्समध्ये आपल्या उत्तम अभिनयानं स्वतःची छाप सोडणारी गिरीजा सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. तिचा साधेपणा आणि सौंदर्यानं प्रभावित होऊन चाहते तिला 'नॅशनल क्रश' म्हणू लागले. ज्या मुलाखतीमुळे गिरीजा व्हायरल झाली, त्याच मुलाखतीत गिरीजा ओकनं तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला. 

गिरीजा ओकनं नुकतीच 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिलेली. या मुलाखतीत बोलताना गिरीजा ओकनं तिच्यासोबत  घडलेल्या एका धक्कादायक घटनेबाबत सांगितलं. गिरीजा ओक म्हणाली की, "लोकल ट्रेनमध्ये लोक तुम्हाला धक्का देऊन, स्पर्श करुन निघून जातात... कधीकधी तर जाणूनबुझून तुमच्यावर येऊन आदळतात. हे फार विचित्र आणि धक्कादायक असलं तरीसुद्धा आता हे अगदी नॉर्मल झालंय... जेव्हा एका मुलानं माझ्यासोबत गैरवर्तन केलं, त्यावेळी मला काही जाणवलं नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला मला माहीत नव्हतं की, तो कुठून आलाय... असू शकतं की, तो एखाद्या बाजूनं आलेला असावा..."

गिरीजा ओक पुढे बोलताना म्हणाली की, "त्यानं त्याचं बोट माझ्या पाठीवर फिरवलं, मग माझ्या मानेपासून, माझ्या पाठीपर्यंत आणि मग गर्रकन फिरला... जोपर्यंत मला कळेल की, नेमकं काय झालंय, तोपर्यंत तो मुलगा गायब झालेला... मी त्याला ओळखूच शकले नाही... ना मला त्याच्याबाबत काही माहीत होतं..." 

एकाच्या थोबाडीत मारलेली... 

गिरीजानं यावेळी बोलताना आपल्या शाळेच्या दिवसातल्या काही गोष्टींबाबत सांगितलं. गिरीजानं बोलताना सांगितलं की, "शाळेत एक मुलगा मला खूप त्रास द्यायचा. त्यावेळी मी त्याला थोबाडीत मारलेली. याच अनुभवानं मला स्वतःसाठी उभं राहायला शिकवलं. त्यानंतर तिनं सांगितलं की, "तिच्या कुटुंबातील महिलांनी खासकरुन तिच्या आईनं तिला मोटिवेट केलं..."

"आई आणि बहिणीनं धीट राहायला शिकवलं"

गिरीजा ओकनं सांगितलं की, "मी खरंच स्वतःला खूप नशीबवान आहे. माझी दीदी, माझी आई... ज्या सर्व महिलांसोबत मी वाढले, ज्यांनी माझा सांभाळ केला, त्या सर्वांनी मला नेहमी धीटपणे वागायला शिकवलं. तेदेखील शांतपणे नाही, तर मोकळेपणानं आणि निश्चयानं. मी लहान असताना माझ्या आईला धीटपणे वागताना पाहिलंय. जर तिला कुणी जाणूनबुजून धक्का देत असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं तिच्या पुढे जात असेल तर, ती न घाबरता बोलायची."

दरम्यान, गिरीजा ओकच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी फार कमी वयातच 'गोष्ट छोटी डोंगरावधी', 'गुलमोहर', 'मानिनी' आणि 'अडगुले मडगुले' यांसारख्या मराठी फिल्म्सपासून सुरुवात केलेली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Girija Oak Blue Saree Photos Viral: ट्विटरवर निळ्या साडीतल्या 'गिरीजा ओक'च्या फोटोंनी घातला धुमाकूळ; नेटकरी म्हणाले, 'अरे ही तर नवी नॅशनल क्रश...'

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget