एक्स्प्लोर

गौतमीचा प्रवास कसा सुरू झाला? पहिला स्टेज परफॉर्मेन्स कुठे केला? सुरूवातीला किती पेमेंट मिळालं?

Gautami Patil Shares Childhood Memories and Career Challenges: गौतमी पाटीलचा प्रवास आर्थिक आणि वैयक्तिक संघर्षातून सुरू झाला. अकलूज लावणी महोत्सवात तिने बॅकडान्सर म्हणून पहिला परफॉर्मन्स केला.

Gautami Patil Opens Up About Her Struggle: थेट प्रश्नांना बिनधास्त उत्तरं देण्यासाठी गौतमी पाटीलने नुकतंच एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली.  या शोमध्ये तिनं  व्हॅलेन्टाईनपासून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या शोमध्ये तिनं आपली राजकीय बाजूही स्पष्ट केली. आज प्रकाशझोतात येणार्‍या गौतमीचा प्रवास नेमका कसा सुरू झाला? तिनं डान्सिंग क्षेत्रात का पाऊल ठेवलं? असे अनेक प्रश्न तिला विचारण्यात  येतात. या प्रश्नांवर गौतमी पाटीलनं स्पष्ट शब्दांत उत्तरे दिले. तसेच बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. 

करिअरच्या प्रवासाबाबत गौतमी म्हणते,  "आई आणि मी इथे आलो. वडील पुन्हा गावाकडे गेले. आम्ही गावी न जाण्याचा निर्णय घेतला. आईने बरेच जॉब केले. आईची एक मैत्रिण झाली होती. तिनं तिच्या मैत्रिणीला, माझ्या पोरीला नृत्याची आवड असल्याचं सांगितलं. मला आईनं डान्स क्लास लावून दिला. आईच्या मैत्रिणीकडून मला कॉन्टेक्ट मिळाला.  मी महेंद्र सरांकडे गेले.  अकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला कार्यक्रम होता. मी तेव्हा बॅकडान्सर होते. मला घुंगरूंबाबतही माहित नव्हते. तो माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता. मी तेव्हा खूप चुकले होते. नंतर शिकले. त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला", असं गौतमी म्हणाली.

"सुरूवातीला माझं 500 रूपये पेमेंट होतं. खरंतर 1000 होते, एका पोराने आमच्याकडून 500 रूपये घेतले होते. मध्यस्थी असल्यामुळे त्यानं आमच्याकडून 500 काढून घेतले. पण 500 घुंगरालाच गेले होते", अशी माहिती गौतमीनं दिली. "मला ज्यांनी ज्यांनी शो मध्ये नेलं आहे. त्यांनी त्यांनी माझ्या माघारी पैसे काढले आहेत. ही गोष्ट मला माहित नव्हती. पण पोरींमध्ये चर्चा करताना याची माहिती मिळायची", असंही गौतमी म्हणाली.

'कदाचित मी या फिल्डमध्ये नसते...'

"माझ्या घरातलं सर्व काही ठीक असतं, तर कदाचित मी या फिल्डमध्ये नसते. वडील असते किंवा आमच्याकडे कुणी लक्ष दिलं असतं, तर मी आज या क्षेत्रात नसते. पण बघायला गेलं तर, हे पण बरं पण झालं, माझ्याकडे कुणी लक्ष दिले नाही", असं गौतमी म्हणाली "अनेक पोरी माझ्याकडे येतात. या क्षेत्रात काम करायचं आहे, असं म्हणतात. पण या क्षेत्रात कोणत्याही मुलीनं येऊ नये, असं मला वाटतं. मी महाराष्ट्रातील लहान मुलींना असं म्हणेन की,  तुम्हाला नृत्य शिकायचं असेल तर, डान्स क्लास लावा.  तिथे डान्स शिका, पण या क्षेत्रापासून लांब राहा", असं गौतमी पाटील म्हणाली.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricketer at Nana Patekar Death : नाना पाटेकर यांचं निधन; पाकिस्तानचा क्रिकेटर ढसाढसा रडला, नानांनी केलेली ती मदत सांगून भरभरुन बोलला!
नाना पाटेकर यांचं निधन; पाकिस्तानचा क्रिकेटर ढसाढसा रडला, नानांनी केलेली ती मदत सांगून भरभरुन बोलला!
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Embed widget