Gautami Patil And Naru Aaji Dance Video: 'गौतमी की नरु आजी... खरं सांगा कोणाचा डान्स लय भारी?'; 'पाव्हणं जेवला काय?' गाण्यावर दोघींनी कंबर मटकवली
Gautami Patil And Naru Aaji Dance Video: झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा हॅन्डलवर गौतमी पाटील आणि नरू आज्जीचा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Gautami Patil And Naru Aaji Dance Video: सुप्रसिद्ध नृत्यांगणा, सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चर्चेत आहे. गौतमी पाटीलनं (Gautami Patil And Naru Aaji Dance Video) आजवर अनेक म्युझिक अल्बम्स (Music Albums) केलेत. तसेच, तिनं मोठ्या पडद्यावर डेब्युसुद्धा केला आहे. अशातच आता गौतमीनं छोट्या पडद्यावर केलेला डेब्यू चर्चेचा विषय ठरला आहे. गौतमी पाटील देवमाणूस मालिकेत पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमोही झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा हॅन्डलवर (Zee Marathi's Official Instagram Handle) शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा (Gautami Patil Dance With Naru Aaji) तुफान पाऊस पाडलाय.
प्रोमो समोर आल्यापासून सोशल मीडियावर गौतमीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी गौतमीचा पावसात चिंब भिजून डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ती, झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत अण्णा नाईकांची भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकरांसोबत तुफान डान्स (Gautami Patil Dance With Naru Aaji Viral Video) करताना दिसली. अशातच आता गौतमीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती 'देवमाणूस' मालिकेतील सरू आज्जीसोबत थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नरू आज्जी आणि गौतमीचा डान्स पाहून तुम्हीही त्यांच्यासोबत ठेका धरल्याशिवाय राहणार नाही.
'देवमाणूस : मधला अध्या' मधल्या नरू आज्जीसोबत गौतमी थिरकली आहे. झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा पेजवर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गौतमी आणि नरू आज्जीनं 'पाव्हणं जेवला काय' (Jevalaa Kaay Official Song) गाण्यावर ठेका धरला आहे. गौतमीच्या लटत्या ठुमक्यांसमोर नरू आज्जी अगदी पुरून उरल्यात. गाण्यावर थिरकताना नरू आज्जीच्या स्टेप्सनी अगदी गौतमीलाही मागे टाकलंय. एवढंच काय तर,नाचताना नरू आज्जी एवढ्या रंगून जातात की, एका क्षणी त्या हातातली काठी बाजूला फेकून देतात आणि गौतमीसोबत लचकत मुरडत डान्स स्टेप्स करतात.
View this post on Instagram
झी मराठीनं गौतमी पाटील आणि नरू आज्जींच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'गौतमी की नरु आजी... खरं सांगा कोणाचा डान्स आहे लय भारी?' असं कॅप्शन या गाण्याला देण्यात आलंय.
दरम्यान, गौतमी पाटीलचा काही दिवसांपूर्वी अलका यागनिक यांच्या गाण्यावर भर पावसात भिजतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेला. पावसात चिंब भिजत गौतमी पाटीलनं तुफान डान्स केला. गौतमीचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला. नुकतीच तिची झी मराठीची लोकप्रिय क्राइम–थ्रिलर मालिका ‘देवमाणूस’ मध्ये गौतमी पाटीलची एन्ट्री झालीये. अशातच आता गौतमी 'देवमाणूस'ची शिकार होणार? की, देवमाणसाचची शिकार करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























