एक्स्प्लोर

Marathi Actress : 'तुला आता देवाचीही साथ राहिली नाही...', सध्याच्या परिस्थितीवर मराठी अभिनेत्रीचे डोळ्यात अंजन घालणारे शब्द

Marathi Actress : मराठी अभिनेत्रीने तिच्या कवितेमधून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 

Marathi Actress : पुरोगामी महाराष्ट्रात मागील आठवडाभरात मुलींवरील अत्याचाराच्या जवळपास 12 घटना घडल्या आहेत. कोल्हापूर, बदलापूर या घटनांनी तर महाराष्ट्र (Maharashtra) सुन्न झाला. बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर अनेक प्रश्न मनात उपस्थित राहू लागले. या सगळ्या घटनांचा महाराष्ट्राने निषेध केलाच, पण मुलींच्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न हा आजही तसाच उभा ठाकलाय, याची लख्ख जाणीवही करुन दिली. 

या सगळ्या घटनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून, रस्त्यावर उतरुन तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला. सरकारवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण या सगळ्या परिस्थितीवर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिची कविता बरंच काही बोलून गेली आहे. गौतमीने तिच्या सोशल मीडियावर ही कविता शेअर केली आहे. 

'स्त्रीचा अपमान झाला आणि महाभारत घडलं'

गौतमीने तिच्या सोशल मीडियावर ही कविता शेअर करत म्हटलं की, 'गेले काही दिवस खूप भयंकर चालूये सगळंच. त्यावर काहीतरी लिहावंसं वाटलं .स्त्री चा अपमान झाला आणि महाभारत घडलं .पण आता काय ?'

गौतमीची कविता

 ये तू आता काळजी घे बाई
कारण तुला वाचवायला आता काही कृष्ण येणार नाही
आता तुझी अब्रु झालीये खूप खूप स्वस्त 
आजूबाजूला दुर्योधन, दु:शासन झालेत मदमस्त
तुझ्यासाठी आता कुणी भीम प्रतिज्ञा करणार नाही
ये आता तू काळजी घे बाई 
आता तुझ्या घरातही नाही होणार तुझी रक्षा 
तुला मिळतेय तुझ्याच स्त्रीत्वाची शिक्षा
आता अधर्मासाठी कुणी महाभारत करणार नाही 
ये आता तू काळजी घे बाई
तू शिकलीस, गेलीस विचारांनी पुढे 
पण नराधमांना कसे देणार नैतिकतेचे धडे?
आजही तुझ्या निऱ्यांना हात घालायला कुणी घाबरणार नाही 
आता तू काळजी घे बाई
तू कपडे कोणतेही घाल 
त्यांच्या लेखी तू वस्रहिन 
अब्रू रक्षणासाठी कुणाकुणापाशी होशील लीन? 
आता तुझा अर्जुनही हातात कायदा घेऊ शकणार नाही 
आता तू काळजी घे बाई 
काळ पुढे गेला माणूस नाही 
धर्म बदलत गेला पण वृत्ती नाही 
आजही भर सभेत लाज तुझीच जाईल
ये आता तू काळजी घे बाई 
सितेला नेली पळवून तेव्हा राम आला होता धावून 
द्रौपदीच्या निऱ्यांना हात घातला तेव्हा कौरवांनी केला पांडवांचा नि:पात 
पण आज तुझा बलात्कार आणि तुझा पुरुष मात्र कायद्यापुढे लाचार
तुला आता देवाचीही साथ राहिली नाही 
तू आता काळजी घे बाई 
आता वेळ बदलायची 
स्वत:हून महाभारतात उतरायची 
दुर्योधनाची मांडी आता स्वत:हून फोडायची 
आता केस बांध, युद्धात उतर बाई 
कारण आता तुला वाचवायला कृष्ण काही येणार नाही 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

ही बातमी वाचा :

Bigg Boss Marathi : रितेश 'भाऊचा धक्का'! 'बिग बॉस मराठी'ने रचला नवा विक्रम, टीआरपीची यशस्वी घोडदौड

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Embed widget