एक्स्प्लोर

Marathi Movie : बहुचर्चित गारुड सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पण निवडकच चित्रपटगृहांमध्ये सिनेमा होणार प्रदर्शित

Marathi Movie : शोधाच्या वाटेत हरवलेलं 'गारुड' नेमकं आहे तरी काय? या प्रश्नाचं उत्तर येत्या 25 ऑक्टोबर रोजी उलगडण्यात येणार आहे.

Marathi Movie :  बहुचर्चित 'गारुड' (Garud Marathi Movie) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिवसांपासून या सिनेमची बरीच चर्चा होती. शोधाच्या वाटेत हरवलेलं हे नेमकं गारुड काय असेल याची छोटीशी झलक नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या गारुड सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सिनेमाच्या ट्रेलरनेही सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. पण येत्या 25 ऑक्टोबरपासून गारुड हा चित्रपट महाराष्ट्रातील काही निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गारुड चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक गुपित लपलेली पाहायला मिळत आहेत. सटवाईने जे नशिबात लिहिलं आहे ते घडतंच, असं म्हणत चित्रपटात या पात्रांबरोबर नेमकं काय काय घडलं हे पाहायला मिळतंय. सूडाची भावना, सत्य-असत्याचा शोध, दडलेली अनेक रहस्ये आणि माणसातलं हरवलेलं माणूसपण हे सारं 2.38 मिनिटांच्या या 'गारुड' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 

सिनेमात 'हे' कलाकार झळकणार

अखेर मन, मेंदूवर बसलेलं हे गारुड सुटणार का?, हे मात्र २५ ऑक्टोबर पासून कळेल. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी, दमदार अभिनेते शशांक शेंडे यांसह पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे या कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.                                 

'किमयागार फिल्म्स एल एल पी' आणि 'ड्रीमव्हीवर' निर्मित आणि 'सनशाईन स्टुडिओ' प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निर्माते ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी केली असून सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोद चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोराम या निर्मात्यांनी बाजू सांभाळली आहे. दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे याचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित आहे. चित्रपटातील रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोराम यांनी संभाळली आहे.  चित्रपटाच्या संगीताबरोबरचं पार्श्वसंगीत हे वाखाणण्याजोगे आहे. ही पार्श्वसंगीताची धुरा संकेत पाटीलने संभाळली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by sachin valanju (@sachin_valanju)

ही बातमी वाचा : 

Marathi Actor : 'आज सर्व पक्षांतील साहेबांच्या कृपेकरुन...', ठाण्यातील घोडबंदर रोडवरील समस्यांवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Opposition :  विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?Solapur Collector PC : Markadwadi त बॅलेटवर मतदान का करू दिलं नाही? जिल्हाधिकारी म्हणालेABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 08 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Embed widget