एक्स्प्लोर

Friday Relese: या विकेंडला काय पहाताय? OTTसह थिएटरमध्ये एकाच दिवशी हे धमाकेदार चित्रपट- वेबसीरिज रिलीज, वाचा लिस्ट

विजय थलपतीपासून विक्रांत मेस्सी, श्रेयस तळपदे, हृता दुर्गुळेपर्यंत अनेक चित्रपट, वेब सिरीज तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवेत

Friday OTT Release: जुलै महिन्याचा शेवटचा वीकेंड मनोरंजनाच्या धमाक्याने सुरू होणार आहे. दर शुक्रवारी ओटीटी आणि चित्रपटगृहांमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात.  या आठवड्यात काहीतरी भन्नाट पहायचा विचार करत असाल तर, थिएटर ते ओटीटी काय रिलीज होणार आहे? जाणून घ्या. या आठवड्यात ॲक्शन, सस्पेन्स, कॉमेडी अशा प्रत्येक जॉनरमधील नवे चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. विजय थलपतीपासून विक्रांत मेस्सी, श्रेयस तळपदे, हृता दुर्गुळेपर्यंत अनेक चित्रपट, वेब सिरीज तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवेत... आज प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट, वेबसिरीजविषयी जाणून घेऊया..

1.  आदर्श बाल विद्यालय

'पंचायत' आणि 'ग्रामचिकित्सालय'नंतर आता प्राईम व्हिडिओवर आणखी एक ग्रामीण पार्श्वभूमी असणारी नवी कथा पाहायला मिळणार आहे. या वेब सिरीजमध्ये के.के. मेनन प्रमुख भूमिकेत आहेत. शांत स्वभावाच्या शाळेच्या मुख्याध्यापक ज्ञानेश्वर त्रिपाठी यांच्या आयुष्यभोवती ही हलकीफुलकी कॉमेडी ड्रामा सिरीज प्रदर्शित झाली आहे.

2. जन नायकन

थलपती विजय यांच्या बहुचर्चित चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आज हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या वादामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन थांबलं होतं. मात्र, आता विजय थलपती, बॉबी देओल, पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा  पॉलिटिकल ड्रामा तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहे.

3.मुसाफिर कॅफे

विक्रांत मेसीची नवी रोमँटिक ड्रामा सीरिज 'मुसाफिर कॅफे' 24 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना प्रमुख भूमिकेत आहेत. प्रेम, नातेसंबंध आणि आयुष्यातील चढ-उतार यांची कथा हलक्या-फुलक्या आणि भावनिक पद्धतीने या सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे.

4.द इंडिया स्टोरी

श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांचा 'द इंडिया स्टोरी' हा चित्रपट 24 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट शेतीमध्ये कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर आधारित आहे. कोर्टरूम ड्रामाच्या माध्यमातून ही गंभीर सामाजिक समस्या मांडण्यात आली असून, चित्रपटात सत्यासाठीचा संघर्ष आणि न्यायाची लढाई दाखवण्यात आली आहे.

5.अगं आई, अहो आई

वरुण नार्वेकर दिग्दर्शित 'अगं आई, अहो आई' ही ZEE5 वरील हलकीफुलकी आणि कौटुंबिक वेब सीरिज आहे. लग्नानंतर सासर आणि माहेर या दोन्ही नात्यांमध्ये समतोल साधताना श्रेया (ऋता दुर्गुळे) हिला येणाऱ्या गमतीशीर आणि भावनिक अनुभवांवर ही कथा आधारित आहे. नुकतेच अनिश (सुयोग गोर्‍हे)सोबत लग्न झालेल्या श्रेयाला आई आणि सासू यांच्यातील नात्यांतील बारकावे समजत जातात. गैरसमज, विनोदी प्रसंग आणि कौटुंबिक नात्यांची सुंदर गुंफण यामुळे ही सीरिज संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखी ठरते.

इश्कनामा

शहनाज गिल आणि जय रंधावा यांचा 'इश्कनामा' हा रोमँटिक ड्रामा 24 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या दोन प्रेमींची ही प्रेमकथा आहे. सीमारेषा, परिस्थिती आणि अनेक अडचणींवर मात करत आपल्या प्रेमासाठी लढणाऱ्या या जोडप्याचा भावनिक प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

7. 72 आवर्स

'72 आवर्स' हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 24 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात 40 वर्षीय मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह केविन हार्ट चुकून Gen-Z च्या बॅचलर पार्टीचा भाग बनतो. नव्या पिढीसोबत जुळवून घेण्याच्या प्रयत्नात त्याच्या आयुष्यात घडणारे मजेशीर प्रसंग आणि गोंधळ या चित्रपटात विनोदी अंदाजात दाखवण्यात आला आहे.

8.पल्लीचट्टाम्बी

'पल्लीचट्टाम्बी' हा अॅक्शन-ड्रामा चित्रपट 24 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 1959 मधील केरळच्या 'मुक्ती संघर्षा'च्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा घडते. पोथन ख्रिस्तोफर या व्यक्तीला एका चर्चमध्ये सुधारणा करण्यासाठी पाठवले जाते. मात्र, तिथे गेल्यानंतर त्याला अनेक कठीण प्रसंगांचा आणि आयुष्यातील कटू वास्तवाचा सामना करावा लागतो.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget