Vikram Sugumaran Death: नव्या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवली अन् वाटेतच मृत्यूनं गाठलं; वयाच्या 47 व्या वर्षी दिग्दर्शकानं जग सोडलं
Vikram Sugumaran Death: तमिळ इंडस्ट्रीमधून खूप दुःखद बातमी समोर येत आहे. खरंतर, तमिळ चित्रपट दिग्दर्शक विक्रम सुगुमरन यांचं 2 जून रोजी चेन्नई इथे निधन झालेलं.

Vikram Sugumaran Death: सिनेसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वयाच्या 47व्या वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक निर्मात्याला नव्या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवून परतत असताना, वाटेतच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.
तमिळ इंडस्ट्रीमधून खूप दुःखद बातमी समोर येत आहे. खरंतर, तमिळ चित्रपट दिग्दर्शक विक्रम सुगुमरन (Tamil Director Vikram Sugumaran Dies) यांचं 2 जून रोजी चेन्नई इथे निधन झालेलं. दिग्दर्शक 47 वर्षांचे होते. विक्रम सुगुमरन (Vikram Sugumaran) यांचं बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. दिग्दर्शकाच्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दिग्दर्शकाला बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला अन्...
मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक विक्रम सुकुमारन एका निर्मात्याला आगामी सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी गेले होते. तिथून काम आटपून मदुराईहून चेन्नईला परतत होते. त्यावेळी प्रवासातच त्यांना मृत्यूनं गाठलं. विक्रम सुगुमरन मदुराईहून चेन्नईला जात होते. प्रवासादरम्यान त्यांच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या. यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना वाचवू शकले नाहीत. दरम्यान, विक्रम सुगुमरन यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि मुले आहेत जी चेन्नईमध्ये राहतात.
प्रसिद्ध तमिळ चित्रपट दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांनी 2 जून रोजी या जगाचा निरोप घेतला. Economic Times च्या वृत्तानुसार, विक्रम सुगुमरन, एका निर्मात्याला नव्या चित्रपटाची स्क्रिप्ट सांगून परतत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या छातीत वेदना जाणवू लागल्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विक्रम सुगुमारन यांच्या अचानक निधनानं तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकार आणि चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
अभिनेता शांतनु भाग्यराजनं वाहिली श्रद्धांजली
दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते शांतनू भाग्यराजनं (Shanthanu Bhagyaraj) आपल्या ट्विटर हँडलवर फिल्म निर्मात्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी फिल्मच्या सेटवर दिवंगत फिल्म निर्मात्यासोबत फोटो शेअर केले आहेत. शांतनुनं लिहिलंय की, "#Rip @VikramSugumara3. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि प्रत्येक क्षण मी नेहमीच जपून ठेवेन. तुम्ही खूप लवकर गेलात. तुमची आठवण येईल."
जस्टिन प्रभाकरननंही व्यक्त केल्या भावना
संगीतकार जस्टिन प्रभाकरन म्हणाले की, "एक चित्रपट निर्माता ज्यानं चौकटीच्या पलीकडे स्वप्न पाहिलं, परंतु आपल्याला खूप लवकर सोडून गेले. तो असंख्य 'अनकही कहानियाँ' घेऊन गेला. विक्रम सुगुमरन सर तुमच्या आत्म्याला शांती मिळो".
दरम्यान, विक्रम सुगुरामनचा शेवटचा दिग्दर्शित केलेला सिनेमा शंतनु भाग्यराजचा रावण कोट्टम हा होता. तसेच, सध्या थेराम पोरम नावाच्या नव्या प्रोजेक्टवर त्यांचं काम सुरू होतं. पण त्यांच्या निधनामुळे प्रोजेक्टवर परिणाम होऊ शकतो. 1999-2000 मध्ये प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक बाळू महेंद्र यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर त्यांनी 'मधा यानी कूटम' नावाचं एक गाजलेलं ग्रामीण नाटक दिग्दर्शित केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























